Dinesh Mongia joins BJP: माजी क्रिकेटपटू दिनेश मोंगिया यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करून राजकीय इनिंगला सुरुवात केलीय. मोंगिया यांनी दिल्लीत केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व स्वीकारल्याची माहिती एएनआय वृत्त संस्थेनं दिलीय. दिनेश मोंगिया मूळचे पंजाबचे आहेत. येत्या काही महिन्यांत राज्यात विधानसभा निवडणुका होणार असून त्यापूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मोंगिया म्हणाले की, मला भाजपच्या माध्यमातून पंजाबच्या जनतेची सेवा करायची आहे. भाजपशिवाय कोणताही पक्ष देशाच्या विकासासाठी काम करू शकत नाही, असंही त्यांनी म्हटलंय.


44 वर्षीय मोंगिया यांनी 2001 मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केलं होतं. या अष्टपैलू खेळाडूनं भारतासाठी 57 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1230 धावांसह 14 विकेट्स घेतल्या., मोंगियांनी 2006 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्याच्या कारकिर्दीतील एकमेव टी-20 सामना न्यू वांडरर्स स्टेडियमवर खेळला, जिथे त्यांनी 38 धावा केल्या होत्या. त्यांनी मे 2007 मध्ये बांगलादेशविरुद्ध ढाका येथे शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यांच्या नावावर केवळ एका शतकाची नोंद आहे.


एएनआयचं ट्वीट- 



मोंगियावर आयसीएल दरम्यान सट्टेबाजी केल्याचा आरोप होता. मॅच फिक्सर, लू व्हिन्सेंटने 2015 मध्ये लंडन न्यायालयात या भ्रष्ट कारवायांमध्ये सामील असलेल्या लोकांपैकी एक म्हणून मोंगियांच नाव घेण्यात आलं होतं. पुराव्याअभावी न्यायायलानं त्यांना सोडून दिलं. 


दरम्यान, मोंगिया यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले. मोंगिया म्हणाले की, “माझ्याविरुद्ध कोणताही पुरावा नव्हता. आयसीएलमध्ये खेळणारा मी एकमेव खेळाडू होतो, ज्याला बीसीसीआयची माफी मिळाली नाही. अंबाती रायुडूनं आयसीएलमध्ये साइन अप केल्याबद्दल माफी मागितली आणि त्यानंतर भारताकडून खेळला."


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-