Telangana NT Rama Rao's Daughter Death: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटी रामाराव यांची धाकटी मुलगी उमा माहेश्वरी यांनी सोमवारी आत्महत्या केली. हैदराबाद येथील राहत्या घरी त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी सीआरपीसी कलम 174 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.



 






उमा माहेश्वरी यांच्या निधनाने संपूर्ण एनटीआर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. एनटीआरच्या कुटुंबातील इतर सदस्य उमा माहेश्वरी यांच्या घरी पोहोचले आहेत. चंद्राबाबू नायडूही लवकरच येणार असल्याची बातमी आहे. परदेशात उपस्थित असलेल्या ज्युनियर एनटीआर यांना उमा माहेश्वरी यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे. सध्या त्यांचे पार्थिव दर्शनासाठी घरी ठेवण्यात आले आहे. यावेळी एनटीआरचे कुटुंबीय, नातेवाईक आणि अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. उमा माहेश्वरी यांच्या निधनाने अनेकजण शोक व्यक्त करत आहेत.




उमा माहेश्वरी 12 भावंडांमध्ये सर्वात लहान होत्या





जुबली हिल्सचे पोलीस अधिकारी राजशेखर रेड्डी यांनी सांगितले की, हे आत्महत्येचे प्रकरण असून तपासानंतरच यामागेचे कारण समजेल. उमा या तेलगू देसम पक्ष(टीडीपी) संस्थापक एनटीआर यांच्या 12 मुलांपैकी सर्वात लहान होत्या