Corona Omicron Variant : कर्नाटकात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळले, त्यापैकी दक्षिण आफ्रिकेतून आलेला रुग्ण दुबईला (First Omicron patient) पसार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एक जण 66 वर्षीय असून दक्षिण आफ्रिकेतून आल्यानंतर ते पॉझिटिव्ह आढळले.  त्यांना कोणतीही लक्षणं नव्हती. त्यांना विलगीकरणात राहण्यास सांगितले. पण जिनोम सिक्वेंसिंगचा अहवाल येण्याआधीच खासगी प्रयोगशाळेकडून निगेटिव्ह कोरोना अहवाल घेऊन आठवडाभरापूर्वी ते दुबईला गेले. 


दक्षिण आफ्रिकेत पाचपट वेगानं पसरणारा ओमायक्रॉन व्हेरियंट भारतात धडकला आहे. त्यामुळेच देशातली आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे.  गेल्या महिनाभरात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सर्व प्रवाशांचं ट्रेसिंग केलं जात आहे. ओमायक्रॉनच्या व्हेरियंटबाबत समजल्यानंतर कर्नाटक सरकारनं दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या 93 जणांना ट्रॅक केलं. यात दोन जण पॉझिटिव्ह आढळले. ओमायक्रॉनच्या चाचणीसाठी नमुने पाठवण्यात आले आणि त्यात दोन्ही रुग्णांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं समोर आले.  


ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्याचं कळताच केंद्रानं परदेशातून येणाऱ्यांसाठी नियम अधिक कडक केले भारतात आल्यानंतरही आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करुन सक्तीचं विलगीकरणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात रुग्ण सापडल्यानं आता महाराष्ट्र सरकारही सावध झालं आहे.
 
महाराष्ट्र सरकारच्या गाईडलाईन्स


12 ऐवजी केवळ 3 देशांचा हाय रिस्क कंट्रीज मध्ये समावेश


साऊथ आफ्रिका, बोट्स्वाना, झिम्बाम्बे हाय रिस्क कंट्रीज


हाय रिस्क कंट्री मधून आलेल्या प्रवाशांना आरटीपीसीआर टेस्ट करणे बंधनकारक


7 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक 


इतर राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी लशीच्या दोन डोसचं प्रमाणपत्र बंधनकारक


किंवा 72 तासांपूर्वीचा आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा


राज्य सरकारही आता सतर्क
ओमायक्रॉन व्हेरियंट अखेर भारतात धडकल्यामुळे राज्य सरकारही आता सतर्क झालंय. ओमायक्रॉन व्हेरियंट किती घातकी आहे? त्यावर कोविड प्रतिबंधक लस कितपत प्रभावी आहे यावर आता जगभरातील लसनिर्मिती कंपन्यांकडून परीक्षण सुरु आहे.   



 



महत्त्वाच्या इतर बातम्या :