बंगळुरु : देशाच्या लष्करामध्ये पहिल्यांदाच महिला मिलिटरी पोलिसांचा समावेश झाला आहे. शनिवारी बंगळुरुतील द्रोणाचार्य परेड ग्राउंडवर या बॅचचे परेड आयोजन करण्यात आलं होतं. या पहिल्या महिला मिलिटरी बॅचमध्ये एकूण 83 महिला आहेत. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता या कार्यक्रमाचे आयोजन छोट्या प्रमाणात करण्यात आलं होतं आणि यावेळी कोरोना संबंधित सर्व नियमांचं पालन करण्यात आलं आहे. 


 






देशातील या पहिल्या महिला मिलिटरी पोलिसांच्या बॅचला 61 आठवड्यांचे कठोर प्रशिक्षण देण्यात आलं आहे. यामध्ये बेसिक मिलिटरी ट्रेनिंग, प्रोवेस्ट ट्रेनिंग तसेच पोलीस ड्युटीचा समावेश आहे. तसेच या बॅचला युद्धातील कैद्यांना व्यवस्थापन, ड्रायव्हिंग तसेच इतर काही कौशल्यांचंही प्रशिक्षण देण्यात आलं आहे. या दरम्यान सिग्नल कम्युनिकेशनचे प्रशिक्षणही देण्यात आलं आहे. भारतीय लष्करासाठी ही एक निर्णायक घटना असेल. 


 









या परेडच्या आयोजनानंतर सिएमपी सेंटरच्या (The Corps of Military Police Centre) प्रमुखांनी या बॅचला शुभेच्छा दिल्या आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या स्तरावर करण्यात येणार होतं. पण कर्नाटकातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता या कार्यक्रमाचे आयोजन छोट्या स्तरावर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान महिला मिलिटरी पोलीस बॅचच्या महिलांमध्ये मोठा उत्साह दिसत होता. 


महत्वाच्या बातम्या :