Punjab News: पंजाबच्या भठिंडा मिलिट्री कॅम्प ( Bathinda Military Station) परिसरात गोळीबार झाल्याची बातमी समोर आली आहे. गोळीबारानंतर कन्टॉन्मेट परिसराला सील करण्यात आले आहे. छावणी परिसरात झालेल्या घटनेनंतर परिसरात प्रवेश करण्यास मनाई आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या गोळीबारात चार जवानांचा मृत्यू झाला आहे. मिलिट्री कॅम्प सील करून सर्च ऑपरेशन सुरू
सैन्याच्या दक्षिणी पश्चिमी कमांडने जारी केलेल्या माहितीनुसार, भटिंडा मिलिट्री कॅम्पमध्ये पहाटे 4.30 वाजता गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये चार जवानांचा मृत्यू झाला आहे. मिलिट्री कॅम्प सील करून सर्च ऑपरेशन सुरू झाले आहे. स्टेशन क्विक रिअॅक्शन टिमला सक्रिय करण्यात आल्या आहेत.
सैन्याने पंजाब पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हा दहशतवादी हल्ला नाही. फायरिंग 80 मीडियम रेजीमेंट आर्टिलरी ऑफिसर्स मेसमध्ये झाली आहे. काही दिवसांपूर्वी यूनिट गार्डच्या खोलीतून एक असॉल्ट रायफल गायब झाली होती. कदचित त्याच रायफलने फायरिंग झाल्याची शक्यता आहे. गोळीबार करणाऱ्याचा तपास सुरू आहे.
भठिंडाचे एसएसपी गुलनीत खुरूना यांना आर्मीकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा दहशतवादी हल्ला नाही. सर्च ऑपरेशन सुरू असून परिसर सील करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच आसपासच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आला आहे.
भंठिंडा हे देशातील महत्त्वाचे सैन्य प्रतिष्ठान आहे. भंठिंडा मध्ये 10 कॉर्प्सचे मुख्यालय आहे. हे स्टेशन जयपूरच्या दक्षिण पश्चिम कमांडच्या अधिकार क्षेत्राखाली येते. स्टेशनमध्ये गोळीबारावेळी ऑपरेशनल आर्मी युनिट उपस्थित होते. भटिंडामधला मिलिट्री कॅम्प हा देशातील सर्वात मोठा लष्कराचा तळ आहे.. चंदीगड-फजिलका हायवेच्या शेजारी स्थित कॅम्पमध्ये सध्या पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या प्रकरणी एका नागरिकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. इन्सॅस श्रेणीतील रायफल काही दिवसांपूर्वी गहाळ झाली होती. त्याच रायफलमधून गोळीबार झाल्याचा संशय आहे. गोळीबार जवानानं केला की नागरिकांनं हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या :