WEB EXCLUSIVE | परराज्यात घेतलेलं वाहन महाराष्ट्रात आणायचंय? 'हे' आहेत RTO चे नियम?

Continues below advertisement

औरंगाबाद : एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जर आपली बदली झाली असेल किंवा काही कारणास्तव आपल्याला राज्य बदलायचं असेल आणि आपल्याकडे चार चाकी किंवा दुचाकी वाहन असेल तर ते ज्या राज्यात आपण जात आहोत तिथे वापरता येतं का? जर वापरायचं असेल तर त्यासाठीचे काय नियम आहेत. इतर राज्यातून जर आपण गाडी खरेदी केली तर आपल्या राज्यात त्याची नोंदणी कशी करावी? त्यासाठीचे टॅक्सेस काय असतात? कुठले फॉर्म भरावे लागतात? हे ना असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतील तर त्याची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

महाराष्ट्र बाहेरील वाहन महाराष्ट्रात आणायचे असेल त्याच्या मध्ये दोन प्रकार पडतात. तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात वाहन आणत असाल तर ते वाहन खाजगी स्वरूपाचे असेल तर तुम्ही अकरा महिने वेहिकल टॅक्स न भरता महाराष्ट्रात वापरू शकता. राज्यात प्रवेश करतेवेळी जो चेक पोस्ट असतो किंवा आरटीओ कार्यालय असते तिथे तुम्हाला तशी सूचना द्यावी लागेल. तिथे तुम्हाला एक अर्ज मिळेल तो भरून द्यावा लागेल. अशा वेळीव आपनास टॅक्स भरायची गरज नाही. गाडी जर कायमस्वरूपी या राज्यातून दुसऱ्या राज्यात घेऊन जात असाल किंवा पत्ता बदलाचा असेल. तुमचा मूळ नोंदणी ज्या आयटीओ कार्यालयात केली आहे. त्याच्याकडून तुम्हाला नमूना क्रमांक 28 मध्ये एनओसी घेऊन यावे लागते. पत्ता बदली करायचा असेल फॉर्म क्रमांक ते 30 मध्ये अर्ज करावा लागतो. तुमी गाडी बाहेर राज्यातील विकत घेत असेल, तर 28 नंबरमध्ये एनओसी लागते. यासाठी इतर फॉर्म लागतात. फॉर्म 29 आणि 30 वाहन हस्तांतरण करण्यासाठी मालक बदल करण्यासाठी हे अर्जाचे नमुने तुम्हाला भरून आरटीओ कार्यालयात जमा करावे लागतील. याबरोबरच नमूना क्रमांक 20 मध्ये तुम्हाला अर्ज करावा लागतो. या वाहनाला त्या ज्या राज्यात तुम्हाला घेऊन जायचे आहे ते राज्य तुमच्या वाहनाला नवीन नंबर देईल. त्यासाठी नवीन अर्ज भरावा लागतो. हे सगळं आपण ऑनलाइन करू शकतो. आरटीओच्या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करू शकता.

इतर राज्यातून आलेल्या वाहनांची आरटीओ तपासणी कशी करते. बाहेर राज्यातून जेव्हा एखादी गाडी येते. या गाडीची आरटीओ कार्यालय तपासणी करते. त्या राज्यातील पोलिस खात्याकडून तेव्हा या चासी नंबरचे वाहन चोरीला गेले आहे का? याची खात्री केली जाते. व एक सर्टिफिकेट घेतले जाते. आणि एनओसीचे कन्फर्मेशन केले जाते. वाहनाची आपण तपासणी करतो म्हणजे की वाहन रोडवर आहे, त्या वाहनाची चासी नंबर तपासली जाते. वाहन चोरीचे आहे. याची तपासणी केली जाते. बऱ्याच राज्यात चोरी झालेली वाहने या राज्यात विक्रीला येतात. मग ती आपल्या राज्यात नोंद होऊ शकतात ती खबरदारी घेण्यासाठी आपण सगळी माहिती घेतो. पोलिस खात्याकडून आपण सगळा रिपोर्ट मागून घेतो. पोलीस खाते त्या वाहनाचा रिपोर्ट सादर करते या गाडी चोरी झालेली नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram