Mask Mandate in Flights: मागील काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यामुळे केंद्र सरकारनं आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमान प्रवासावेळी मास्कसक्ती हटवली आहे. बुधवारी केंद्र सराकरने नियमावली जारी केली आहे. यामध्ये विमानप्रवास मास्क वापरण अनिवार्य नाही, पण मास्क वापरवा असे म्हटले आहे.

  










नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने (DGCA) विमानप्रसातील मास्कसक्तीचा निर्णय मागे घेतल्याचं बुधवारी सांगितलं. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने बुधवारी विमान प्रवासातील कोरोना नियमाची चाचपणी करत नियमांत बदल केला आहे. नवीन नियमांनुसार, आता विमानप्रवास करताना मास्क सक्ती नसेल. पण मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. त्यासोबत मास्क न वापरणाऱ्याकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाचा नियमही मागे घेण्यात आला आहे. मास्क न घातल्यास दंड आकारण्यात येईल, अशी घोषणा यानंतर विमानात होणार नाही. 


मागील काही दिवसांपासून देशातील कोरोनाची स्थिती कशी? : 
19 डिसेंबर 2020 रोजी कोरोना प्रकरणांनी देशात एक कोटींचा आकडा पार केला होता. गेल्या वर्षी 4 मे रोजी बाधितांची संख्या दोन कोटींच्या पुढे गेली होती. तर, 23 जून 2021 रोजी ही संख्या तीन कोटींच्या पुढे गेली होती. यावर्षी 25 जानेवारी रोजी संसर्गाची एकूण प्रकरणे चार कोटींच्या पुढे गेली होती. तर, आता एकूण कोरोना बाधितांची संख्या 4 कोटी 46 लाख 67 हजार 311 झाली आहे.  कोरोना महामारीमुळे अनेकांचा मृत्यू झाला, अनेकजण बेघर झाले. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. रोजगार गेल्यामुळे अनेक कुटुंब संकटात आली होती. कोरोनावर मात करण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात आलं. पण मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग कोरोनावरील सर्वात मोठा उपाय असल्याचे अनेकदा डॉक्टरांनी सांगितलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे, मात्र अद्याप धोका कायम असल्याचं काही तज्ज्ञांनी सांगितलं आहे. त्यामुळे मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हे नियम पाळावेच.