नवी दिल्ली : दिल्लीमध्ये पुन्हा एकदा केजरीवाल यांचेच सरकार येणार असून अरविंद केजरीवाल हे हॅटट्रिक साधणार असल्याचा अंदाज एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. भाजपने केलेला जोरदार प्रचार आणि टीकांच्या आक्रमणासमोर आम आदमी पार्टीकडेच दिल्लीचा गड राहणार असल्याचा अंदाज आहे. दिल्लीमध्ये 2020 च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 70 जागांपैकी आम आदमी पक्षाला 51 ते 65 जागा मिळण्याचा अंदाज आहे. या आकड्यानुसार पुन्हा एकदा केजरीवाल यांची एकहाती सत्ता दिल्लीत येण्याची चिन्हे आहेत. भाजपला यावेळी 5 ते 19 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 0 ते चार जागा मिळण्याचा अंदाज आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे अरविंद केजरीवाल यांना शह देण्यासाठी भाजपने उभे केलेल्या मनोज तिवारी यांची जागा देखील धोक्यात असल्याचे या सर्व्हेत सांगण्यात आले आहे.


Delhi Opinion Poll | दिल्लीकरांचा विश्वास केजरीवालांवरच, पुन्हा सत्ता 'आप'च्या हाती, सर्वेचा अंदाज

कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार 

आम आदमी पक्ष -  51 ते 65 जागा

भाजप - 3 ते 17 जागा

काँग्रेस -0 ते 3 जागा

कोणत्या पक्षाला किती टक्के मतदान 

आप - 50.4

भाजप - 36

काँग्रेस - 9

इतर - 2.6

दिल्ली विधानसभेसाठी मतदान झालं. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 57 टक्क्यांपर्यंत मतदानाची टक्केवारी होती. संध्याकाळच्या टप्प्यातले आकडे अजून यायचे आहेत. दिल्लीतल्या इतर भागात कमी, मध्यम असा प्रतिसाद मिळत असताना शाहीन बाग परिसरात मात्र नागरिकांनी मतदानाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. सकाळपासूनच इथं मतदानासाठी गर्दी होती. आता हे सगळे मतदानाचे पॅटर्न पाहताना याचा फायदा कोणाला होणार, फटका कोणाला बसणार, दिल्लीकरांचा मूड काय सांगतो. त्याच अनुषंगानं एबीपी माझा आणि सी व्होटरचा सर्व्हे या सगळ्याचे अंदाज आपल्याला देणार आहे. दिल्लीतलं मतदान संपल्यानंतर आता दिल्लीचा मूड सांगणारा हा सर्वात मोठा एक्झिट पोल आहे.

Delhi Election 2020 Opinion Poll : मुख्यमंत्रीपदी पुन्हा केजरीवाल यांनाच पसंती

2015 च्या निवडणुकीत काय होती स्थिती
2015 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने 70 जागांपैकी 67 जागांवर दणदणीत विजय मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी भाजपला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या तर काँग्रेसला खातं देखील उघडता आलेलं नव्हतं.

माझा विशेष | 'गाली और गोली'नं दिल्ली जिंकता येईल? मुस्लीमांचे कैवारी पंतप्रधान मोदी गप्प का?