Sharad Yadav Demise: जेडीयूचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांचं 75 व्या वर्षी निधन झालं. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शरद यादव सात वेळा लोकसभेवर आणि तीन वेळा राज्यसभेवर गेले आहेत. एक काळ असा होता यांच्या राज्यसभेतल्या भाषणांची खूप चर्चा व्हायची. गेल्या काही दिवसांपासून विजनवासात, शेवटी शेवटी जे डी यु ने बडतर्फही केलं होतं. त्यांची मुलगी सध्या काँग्रेसमध्ये आहे. शरद यादव यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांना अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनी शरद यादव यांना श्रद्धांजली अर्पण केली. विनोद तावडे, जितेंद्र आव्हाड, तेजस्वी यादव, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक त्यांनी ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 


विद्यार्थी दशेपासून राजकारणापासून सुरुवात केलेल्या शरद यादव यांनी राजकारणात खूप उंची प्राप्त केली. दांडगा जनसंपर्क आणि लोकांशी जुळलेली नाळ या गोष्टींनी त्यांना नेहमी लोकांमध्ये मानाचं स्थान मिळालं.  उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार या तीन राज्यांमधून शरद यादव यांनी लोकसभेवर खासदार म्हणून काम केलं. सात वेळा खासदार म्हणून त्यांनी काम केलं. शरद यादव यांनी 1974 पासून संसदीय राजकारणात खासदार म्हणून पाऊल टाकलं. 


























































शरद यादव हे मुळचे मध्य प्रदेश मधील होते. 1974 मध्ये त्यांनी संसदीय राजकारणाला सुरुवात केली होती. शेतकरी, कामगारांच्या मुद्यांवर शरद यादव यांनी भरीव काम केलं आहे. शरद यादव यांच्या निधनावर देशभरातील सर्वच नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. बडे बडे नेते शरद यादवांच्या राजकीय प्रवासाचं वर्णन करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना दिसत आहेत.