Indigo Flight Emergency Landing:  शुक्रवारी (4 ऑगस्ट) रोजी सकाळी दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या (Indigo) 6E 2433 चे फ्लाईटचे पाटणा विमानतळावर (Patana Airport) इमर्जन्सी लँडिंग (Emergency Landing) करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकाराची माहिती देताना पाटणा विमानतळाच्या संचालकांनी सांगितले की, दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E 2433 मध्ये उड्डाण केल्यानंतर तीन मिनिटांनी त्याच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. याबाबतची माहिती विमानाच्या पायलटने दिला आणि इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली. यानंतर उड्डाणानंतर लगेचच विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले आहे.


विमानतळाचे कामकाज सुरळीत 


दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे सकाळी 9 वाजून 11 मिनिटांनी सुरक्षित लँडिंग करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. विमानाचे इमर्जन्सी लँडिंग झाले तरी विमानतळावरील सर्व कामकाज सुरळीत सुरु आहे. इमर्जन्सी लँडिंगमुळे प्रवाशांमध्ये काहीशी अस्वस्थता पसरली होती. मात्र,सुरक्षित लँडिंग झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. 


विमानात 181 यात्रेकरु करत होते प्रवास 


दिल्लीला जाणाऱ्या या इंडिगोच्या विमानाने पाटणा विमानतळावरुन सकाळी  8 वाजून  48 मिनिटांनी उड्डाण केले होते. या विमानामध्ये एकूण 181 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच विमानातील तांत्रिक अडचण दूर झाल्याची माहिती देखील विमानतळावरील प्रशासनाने दिली आहे. परंतु हे विमान दिल्लीला पाठवता येणार नाही. त्यामुळे प्रवाशांना दिल्लीला जाण्यासाठी लखनौवरुन विमान मागवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याच विमानाने या सर्व प्रवाशांना दिल्लीला जाता येणार आहे. 


बांग्लादेशाच्या विमानाचे झाले होते इमर्जन्सी लँडिंग


पाटणा विमानतळावर 5 मे रोजी बांगलादेशच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. हे विमान बांग्लादेशमधून काठमांडूला जात होते. मात्र एका प्रवाश्याच्या वैद्यकीय समस्येमुळे विमानाचे पाटणा येथे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. या विमानामध्ये एकूण 77 यात्रेकरु प्रवास करत होते. दुपारी 12.35 मिनिटांनी या विमानाने बांग्लादेशवरुन उड्डाण केले. दरम्यान प्रवाशांना जवळपास चार तास या विमानामध्ये वाट पाहावी लागली होती. 


जेव्हा याची माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोलला मिळाली तेव्हा पाटणा विमानतळ विमानाच्या जवळ होते. त्यामुळे पाटणा विमानतळावर विमानाला इमर्जन्सी लँडिंगला करण्यासाठी मंजुरी देण्यात आली होती. परंतु कोणत्याही प्रवाशांना विमानाच्या बाहेर पडण्याची परवनागी देण्यात आली नाही. विमानातच त्यांना आवश्यक गोष्टी पुरवण्यात येत होत्या. मात्र समस्या दूर झाल्यानंतर विमानाने पुन्हा काठमांडूच्या दिशेने उड्डाण केले. दरम्यान पाटणा विमानतळाच्या प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. 


हेही वाचा: 


X-59 Aircraft : जगातील पहिलं सुपरसॉनिक विमान उड्डाणासाठी सज्ज, आता रशिया-चीनचीही चिंता वाढली