Latest Decision of Saudi Arabia on Petroleum Production: जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती (Petrol Diesel Rates) पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. जगात कच्च्या तेलाचा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या सौदी अरेबियानं (Saudi Arabia) सध्या उत्पादन वाढवण्यास नकार दिला आहे. सौदी अरेबियानं सांगितलं की, तेल उत्पादनात दररोज 10 लाख बॅरलची कपात सुरूच ठेवणार आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price) स्थिर ठेवण्यासाठी ही कपात केल्याचं सौदी अरेबियाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.  


कोरोनामुळे पेट्रोल-डिझेलचे दर मंदावले 


कोरोना महामारीमुळे जगभरातील उद्योगांच्या उत्पादनात घट झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची मागणी खूपच कमी झाली होती. त्यामुळे त्याच्या किंमतीही मोठ्या प्रमाणात घसरल्या होत्या. कच्च्या तेलाच्या (Petrol Diesel Price) मंदावलेल्या किमतींना गती देण्यासाठी सौदी अरेबियानं या वर्षी जुलैपर्यंत तेल उत्पादनात दररोज 10 लाख बॅरल कपात करण्याची घोषणा केली होती. मात्र आता ही कपात सप्टेंबर अखेरपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय सौदी अरेबियानं घेतला आहे.


गरज पडल्यास कपातीची मुदत वाढू शकते : सौदी अरेबिया 


सौदी प्रेस एजन्सीनं दिलेल्या वृत्तानुसार, सौदी अरेबियाच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात बोलताना सांगितलं की, गरज भासल्यास, तेल उत्पादनातील या कपातीचं प्रमाण वाढवून मुदतही आणखी वाढवली जाऊ शकते. सौदी अरेबियाच्या या अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज (OPEC) आणि सहयोगी देशांच्या खबरदारीच्या उपाययोजनांना बळ देण्यासाठी आम्ही ही अतिरिक्त ऐच्छिक कपात केली आहे. तेल बाजार स्थिर ठेवण्यासाठी (Petrol Diesel Price) आणि समतोल राखण्यासाठी उत्पादनात कपात केली जात आहे.


ओपेक प्लस देशांनी निर्णय घेतला


पेट्रोलियम उत्पादक देशांची संघटना असलेल्या OPEC आणि सहकारी देशांनी (OPEC Plus) कच्च्या तेलाच्या नरमलेल्या किमतींना गती देण्यासाठी उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या देशांनी पुढील वर्षापर्यंत उत्पादनात कपात सुरू ठेवण्याचं मान्य केलं आहे. सुरुवातीला रशियाला हा निर्णय मान्य नव्हता, पण नंतर रशियानंही या निर्णयाला संमती दिली. त्याचबरोबर अमेरिकेसह पाश्चात्य देश तेल उत्पादन वाढवण्याची मागणी ओपेक देशांकडे करत आहेत.


देशातील महानगरांत पेट्रोल-डिझेल स्थिर 



  • दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर (Delhi Petrol Diesel Price)

  • मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर (Mumbai Petrol Diesel Price)

  • कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर 

  • चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर 


दररोज सकाळी 6 वाजता होतात दर अपडेट 


दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.