Electric Bus: देशभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी आता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भारतात इलेक्ट्रिक कार, बाईक आणि स्कूटरची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे. अशातच आता देशातील विविध राज्यांमधील सरकार सार्वजनिक वाहतुकीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करत आहे. यामध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. राज्यात एसटी महामंडळाने पहिली इलेक्ट्रिक बस शिवाई रस्त्यावर उतरवली. यानंतर मुंबई महानगरपालिकेने बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसचा समावेश केला. तसेच अलीकडेच पालिकेने नुकतीच भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बस मुंबईत लॉन्च केली आहे. येत्या काळात टप्प्याटप्प्याने 200 इलेक्ट्रिक डबल डेकर बस या बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्य सरकार आता सार्वजनिक वाहतुकीमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करत आहेत. या शर्यतीत कोण-कोणती राज्य आहेत, याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.


बेंगळुरूमध्ये धावणार इलेक्ट्रिक बस 


आघाडीची वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने आज घोषणा केली की, कंपनीला बेंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्‍सपोर्ट कॉर्पोरेशन (बीएमटीसी) कडून 921 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर मिळाली आहे. कन्‍वर्जन्‍स एनर्जी सर्विसेस् लिमिटेडच्‍या मोठ्या टेंडरअंतर्गत टाटा मोटर्स करारानुसार 12 वर्षांसाठी 12-मीटर इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करण्‍यासोबत कार्यसंचालन व देखरेख पाहणार आहे. टाटा स्‍टारबस स्‍वदेशी विकसित करण्‍यात आलेली वेईकल असून या वेईकलमध्‍ये स्थिर व आरामदायी प्रवासासाठी डिझाइन केलेली उच्‍च दर्जाची डिझाइन व दर्जात्‍मक फीचर्स आहेत. यामुळे आता लवकरच बेंगळुरूमध्येही सार्वजनिक वाहतुकीत इलेक्ट्रिक बस पाहायला मिळणार आहे.


दिल्ली सरकारनेही दिली 1,500 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर 


दिल्ली सरकार सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या डिझेल बसेसऐवजी इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करणार आहे. डिझेलवर चालणाऱ्या बसेस पूर्णपणे बदलून त्याऐवजी इलेक्ट्रिक बसेस आणण्याची सरकारची योजना आहे. दिल्ली परिवहन महामंडळाने (DTC) टाटा मोटर्सला 1,500 इलेक्ट्रिक बसेसची ऑर्डर दिली आहे. दरम्यान, आजपर्यंत टाटा मोटर्सने भारतातील अनेक शहरांमध्‍ये 715 हून अधिक इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा केला आहे, ज्‍यांनी एकूण 40 दशलक्ष किलोमीटर्सहून अधिक प्रवास केला आहे.


संबंधित बातम्या: 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI