Election Voting Percentage Data : अधिवक्ता प्रशांत भूषण यांनी मतदानाची आकडेवारी लवकर जाहीर करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवली आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड म्हणाले की, या प्रकरणाची सुनावणी आज होणार आहे. 


डी. वाय. चंद्रचूड (CJI Dy Chandrachud) यांनी निवडणूक आयोगाच्या वकिलाला याचिकेवर आपली बाजू मांडण्यास सांगितलं आहे. आज न्यायालयात दाखल असलेल्या इतर प्रकरणांच्या सुनावणीनंतर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) याचिकेत निवडणूक आयोगाला 48 तासांत मतदानाची आकडेवारी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीचे सातपैकी चार टप्पे झाले आहेत. त्याचवेळी मतदानाची आकडेवारी उशिरा जाहीर होत असल्याचा आरोप काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी केला आहे. अशा स्थितीत मनात शंका निर्माण होते.


कोण काय म्हणाले?


बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव म्हणाले होते, “कोठे आणि किती मतदान झाले याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी पूर्ण पारदर्शकता राखली पाहिजे. यापूर्वी वेळेवर आकडेवारी जाहीर केली जात होती, मात्र आता त्यात विलंब होत असल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही 'इंडिया' आघाडीत समाविष्ट पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहून निवडणूक आयोगावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते.


किती टक्के मतदान झाले?


लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या चार टप्प्यात एकूण 66.95 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने गुरुवारी (16 मे) दिली. आयोगाने म्हटले आहे की सुमारे 97 कोटी नोंदणीकृत मतदारांपैकी 45.1 कोटी लोकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या