Congress : उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), उत्तराखंड(Uttarakhand) , पंजाब (Punjab), गोवा (Goa) आणि मणिपूरच्या (Manipur) विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections 2022) काँग्रेसच्या (Congress) पराभवावर विचारमंथन करण्यासाठी सोनिया गांधी यांनी रविवारी दुपारी 4 वाजता काँग्रेस कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. काँग्रेस मुख्यालयात होणाऱ्या या बैठकीला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हेही उपस्थित राहणार आहेत.


पाच राज्यांतील पराभवावर काँग्रेस करणार विचारमंथन


पाचही राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड मतांनी यश मिळाले. आणि कॉंग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. पाच राज्याच्या आजच्या निकालानं जातींच्या पारंपरिक राजकारणाचे प्रयोगही निष्प्रभ करुन टाकले आहेत. पंजाबमध्ये दलित मुख्यमंत्री देण्याचा काँग्रेसचा प्रयोग...उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचं मंडल 2.0 हे दोन्ही प्रयोग आजच्या निकालानं अपयशी ठरवले. पंजाबमध्ये प्रस्थापितांना नाकारत लोकांनी आपचा पर्याय निवडला. तर जातीपातींची समीकरणं साधत गठबंधनाची मोळी बांधूनही अखिलेश यांना विजयश्री खेचता आली नाही. निकालानंतर राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी शुक्रवारी सायंकाळी उशिरा झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत कपिल सिब्बल, अखिलेश प्रसाद सिंह, मनीष तिवारी आणि इतर काही नेते उपस्थित होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत काँग्रेस नेते राहुल गांधींवर निशाणा साधत त्यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करण्यात आले की, त्यांनी पक्षाध्यक्ष सोडला आहे, पराभवाची जबाबदारी स्वत: स्वीकारायची नाही, मग ते चन्नी यांना अध्यक्षपदाचा चेहरा कसा देणार? 


प्रियांका गांधी यांच्या यूपीमधील कामगिरीवरही प्रश्न


निवडणुकीत प्रियांका गांधी यांच्या यूपीमधील कामगिरीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. यूपीमध्ये प्रियांकाच्या मेहनतीचे काम का झाले नाही? मेहनत करूनही यश न मिळणे यावरून पक्षाच्या केंद्रीय धोरणांवरील प्रश्न आणि त्रुटी दिसून येतात, असे या बैठकीत सांगण्यात आले. याआधी गुरुवारी काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सिंग सुरजेवाला यांनीही काँग्रेस कार्यकारिणीच्या (सीडब्ल्यूसी) बैठकीची माहिती दिली होती. त्यांनी सांगितले होते की पक्षाने निकालांचे आत्मपरीक्षण करण्यासाठी लवकरच CWC ची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसचा जी-21 नेता तोच गट आहे, ज्याने ऑगस्ट 2020 मध्ये पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून काँग्रेसमधील सक्रिय अध्यक्ष आणि संघटनेत बदल करण्याची मागणी केली होती. उत्तर प्रदेशात काँग्रेसला 2 जागा मिळाल्या आहेत. पक्षाला उत्तराखंडमध्ये 19, पंजाबमध्ये 18, गोव्यात 11 आणि मणिपूरमध्ये पाच जागा मिळाल्या.


उत्तर प्रदेश झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी हैं, पाच राज्यांच्या निकालानंतर भाजपची घोषणा, मुंबई महापालिका जिंकण्याचाही विश्वास


Goa Winner List : गोव्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर, वाचा भाजपच्या विजयी उमेदवारांची यादी


केजरीवालांच्या 'झाडू'पुढे विरोधक साफ, एकहाती सत्ता, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनाही धोबीपछाड