Election Result 2022 : पाच राज्यांत भाजपने जोरदार बाजी मारली. त्यानंतर आता महाराष्ट्रात सत्तांतर होणार का? याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपचे नेते जाहीरपणे महाराष्ट्र बाकी आहे अशा घोषणा देत आहेत त्यामुळे या चर्चांना बळ मिळत आहे. भाजपा नेत्यांनी ‘उत्तर प्रदेश झाँकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’ असा घोषणा दिल्या. पाच पैकी चार राज्यात भाजपने मुसंडी मारली त्यांनतर आता सगळ्यांच्या नजरा महाराष्ट्राकडे लागल्या आहेत. या निकालाचा राज्याचा राजकारणावर परिणाम होईल अशी आशा भाजपच्या आमदारांना आहे. तर येणार्या काळात मुंबई महापालिका निवडणुकीतही भाजप बाजी मारेल असा विश्वास आशिष शेलार यांनी व्यक्त केलाय
महाराष्ट्रात सध्या तीन पक्षाचं सरकार आहे. पाचपैकी चार राज्यात जोरदार मुसंडी मारल्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचाही आत्मविश्वास वाढणार आहे. त्यामुळे आजच्या निवडणूक निकालामुळे महाविकास आघाडीतही अस्वस्थता असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राज्यातील निवडणुकीच्या निकालाचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही
पाच राज्यातील निवणुकींच्या निकालानंतर नाना पटोले म्हणाले की, " पंजाबमध्ये अवास्तव घोषणा आप ने केल्या, जेजाहिरनाम्यात सांगितलंय ते पूर्ण होणार का यावर आमचं लक्ष असेल.गोव्यात मागे जो डाका पडला होता तो पडू नये याची काळजी घेणं आमचं काम होतं ते आम्ही केलं. महाराष्ट्रातल्या राजकारणावर या निकालाचा काहीही परिणाम होणार नाही. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणूकीबाबत आता फार वेळ घालवू नये, असं त्यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. यूपीनंतर सर्वात मोठ राज्य महाराष्ट्र आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात भाजप सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करेल यात शंका नाही. अर्थात तीन पक्षाची एकी किती टिकते हे पाहावं लागेल. पण चार राज्यात भाजपची मुसंडी.. महाराष्ट्र सरकारवर धोक्याची घंटा ठरणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Nana Patole: आम्हाला आत्मचिंतनाची गरज' पाच राज्यातील निवडणुकींच्या निकालांनंतर पटोलेंची प्रतिक्रिया