नवी दिल्ली : नीती आयोगाचे विद्यमान उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी राजीनामा दिल्याने, रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदावर अर्थतज्ज्ञ डॉ. राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी रात्री त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
विद्यमान उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी राजीनामा सादर केला. यावेळी त्यांनी पुन्हा अकादमी क्षेत्रात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या राजीनाम्यामुळे नीती आयोगाचं पद रिक्त होणार होतं. पण पाच दिवसातच या पदावर राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राजीव कुमार यांनी1978 मध्ये लखनऊ विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएच.डीचं शिक्षण पूर्ण केलं. यानतंर 1982 मध्ये ऑक्सफोर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रातून डि.फिल पदवी मिळवली.
कुमार यांना देशभरातील प्रसिद्ध अर्थतज्ज्ञांपैकी एक म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी अर्थव्यवस्था आणि भारताची राष्ट्रीय सुरक्षेवर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. नुकतंच पंतप्रधान मोदींवरील 'मोदी अॅण्ड हिज चॅलेंजेस' (2016) आणि 'रिसर्जंट इंडिया', अशी दोन पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
राजीव कुमार हे सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च दिल्लीमध्ये वरिष्ठ फेलो आहेत. तसेच पुण्याच्या गोखले इकॉनॉमिक्स अॅण्ड पॅलिटिक्स संस्थानचे कुलपती आहेत. शिवाय त्यांच्याकडे किंग अब्दुल्ला पेट्रोलियम स्टडिज् आणि रिसर्च सेंटर (रियाद), मानव विकास संस्थान, दिल्ली आणि गिरी विकास अध्ययन लखनऊच्या प्रबंधन बोर्डावर कार्यरत आहेत.
यापूर्वी त्यांनी इंडिया फाऊंडेशन नावाच्या संस्थेची स्थापना करुन, काहीकाळ या संस्थेचं संचालक पदही भूषवलं आहे.
नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अर्थतज्ज्ञ राजीव कुमार यांची नियुक्ती
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Aug 2017 06:40 PM (IST)
नीती आयोगाचे विद्यमान उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी राजीनामा दिल्याने, रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदावर अर्थतज्ज्ञ डॉ. राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी रात्री त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
फोटो सौजन्य : ट्विटर
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -