नवी दिल्ली : निवडणूक रोखे प्रकरणावरून तसेच देशभरात विरोधी पक्षांमधील नेत्यांवरच करत असलेल्या कारवाईवरून टीकेची झोड होत असलेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) प्रथमच मोठा निर्णय घेत थेट सहा राज्यातून गृह सचिवांना तातडीने हटवण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या सहा राज्यांमधील गृह सचिवांना हटवण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच मिझोराम आणि हिमाचल प्रदेशमधील सामान्य प्रशासकीय विभागाच्या सचिवांनाही हटवण्यात आले आहे.
तीन वर्ष कार्यकाळ झालेल्या अधिकाऱ्यांना बदलण्याचे निर्देश
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांचा समावेश असलेल्या मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक आज (18 मार्च) झाली. आयोगाने सर्व राज्य सरकारांना निवडणुकीशी संबंधित कामाशी संबंधित अधिकाऱ्यांची बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये ज्यांनी तीन वर्षे पूर्ण केली आहेत किंवा ते त्यांच्या मूळ जिल्ह्यात आहेत अशा अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
बीएमसी आयुक्तांच्या बदलीचे निर्देश, मुख्य सचिवांकडे नाराजी
दरम्यान, महाराष्ट्राने महाराष्ट्रातील काही महापालिका आयुक्त आणि काही अतिरिक्त / उपायुक्तांच्या संदर्भात निर्देशांचे पालन केलेलं नाही, या संदर्भात मुख्य सचिवांकडे आयोगाने नाराजी व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाने बीएमसी आणि अतिरिक्त / उपायुक्तांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले आहेत. आज (18 मार्च) संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्य सचिवांना महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकांचे सर्व समान महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त / उपमहानगरपालिका आयुक्तांच्या बदल्या करण्याचे निर्देश देण्यात आले.
इतर महत्वाच्या बातम्या