Earthquake Delhi-NCR : दिल्ली एनसीआरमध्ये भूकंप झाला आहे. हा भूकंप शनिवारी रात्री 7.57 वाजता झाला. हा भूकंप 5.4 एवढ्या  रिश्टर स्केलचा होता. भूकंपाचे धक्के इतके जबरदस्त होते की लोक घराबाहेर पळू लागले. कंपनांमुळे घाबरलेले लोक घराबाहेर आणि कार्यालयाबाहेर मोकळ्या जागेत जमा झाले. उत्तर भारतात भूकंप होण्याची आठवड्यातील ही दुसरी वेळ आहे. 


दल्लीसह उत्तराखंडच्या पिथौरागढ, बागेश्वर, टिहरी आणि रुद्रप्रयागमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. तर आज सायंकाळी 7.57 च्या सुमारास नेपाळमध्ये 5.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र नेपाळ असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली-एनसीआरमधील फरिदाबाद, गुरुग्राम, गाझियाबाद, नोएडा, हापूर येथेही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दरम्यान, याआधी मंगळवारीही दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे जोरदार धक्के बसले होते. त्यावेळीही नेपाळ हे भूकंपाचे केंद्र होते. यावेळी डोटी जिल्ह्यात घर कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला होता.  दुपारी 1:57 वाजता हा भूकंप झाला होता. या भूकंपाची तीव्रता 6.3 नोंदवण्यात आली होती.  






भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 10 किमी खोलीवर


मिळालेल्या माहातीनुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये फरिदाबाद, गुरुग्राम, गाझियाबाद, नोएडा, हापूर येथे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने जारी केलेल्या ट्विटनुसार रात्री 7.57 वाजता भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 10 किमी खाली होता. 


दिल्लीत वारंवार भूकंप का होतात? 
दिल्ली-एनसीआर अंतर्गत 100 पेक्षा जास्त लांब आणि खोल दोष असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. यापैकी दिल्ली-हरिद्वार रिज, दिल्ली-सरगोधा रिज आणि ग्रेट बाउंडरी फॉल्टवर आहेत. त्यामुळे दिल्लीत वारंवार भूकंप होत आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 


 हिमाल प्रदेशात मोठ्या भूकंपाची शक्यता
 हिमाल प्रदेशात मोठा भूकंप होण्याची शक्यता शास्त्रज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. भूकंपाच्या दृष्टिकोनातून हिमाचल अतिशय संवेदनशील असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. येथे नेहमीच मोठा भूकंप होण्याची शक्यता असते. मोठ्या भूकंपाची भीती बाळगण्याऐवजी त्याचा सामना करण्यासाठी ठोस तयारी करण्यावर भर दिला पाहिजे, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. 


 


महत्वाच्या बातम्या


Rajiv Gandhi: राजीव गांधी हत्याकांडातील दोषी नलिनी श्रीहरनची 31 वर्षांनंतर तुरुंगातून सुटका, इतर सहा जणही होणार मुक्त