नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआर (Delhi) आणि यूपीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचं (Earthquake) केंद्रबिंदू हे नेपाळमध्ये होतं. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, या भूकंपाची तीव्रता ही  5.6 रिश्टर स्केल इतकी होती. मागील तीन दिवसांमध्ये हा दुसरा भूकंप आहे. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास 6.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचे केंद्र नेपाळ होते आणि त्याचे हादरे दिल्लीपर्यंत जाणवले.






शुक्रवारी झालेल्या या भूकंपात 157 जणांना आपला जीव गमवला. तसेच यामध्ये शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. 2015 मध्ये नेपाळमध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यानंतर आलेल्या भूकंपामुळे सुमारे 9,000 लोकांचा मृत्यू झाला आणि 22 हजारांहून अधिक लोक जखमी झाले.






नेपाळमध्ये दुसरा भूकंप 


मागील तीन दिवसांत पुन्हा एकदा नेपाळ भूकंपाच्या धक्क्याने हादरलं आहे. शुक्रवारी देखील नेपाळमध्ये भूकंप आला होता. या भूकंपाचे धक्के दिल्ली एनसीआर, यूपी, बिहार, उत्तराखंड आणि हरियाणासह देशातील अनेक भागात जाणवले. या देखील भूकंपाचं केंद्र हे नेपाळमध्ये होतं. भूकंपामुळे जाजरकोट जिल्ह्यातील 1,800 घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच रुकुम पश्चिम भागामध्ये 2,500 घरं उदध्वस्त झाली आहेत. 


भारताने आपत्कालीन मदत क्रमांक जारी केला


भारताने नेपाळमध्ये राहणाऱ्या भारतीय भूकंपग्रस्तांसाठी आपत्कालीन संपर्क क्रमांक जारी केला आहे. +977-9851316807 हा आपत्कालीन क्रमांक आहे. भूकंपग्रस्त लोक परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या या क्रमांकावर संपर्क साधून ज्यांना तात्काळ मदत हवी आहे ते मदतीसाठी आवाहन करू शकतात. 


हेही वाचा : 


Nepal Earthquake : नेपाळमधील भूकंपातील मृतांची संख्या 157 वर; भारताकडून आपत्कालीन मदत क्रमांक जारी