Earthquake :  अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि उत्तर भारताच्या अनेक ठिकाणी गुरुवारी (11 जानेवारी) दुपारच्या सुमारास भूकंपाचे धक्के (Earthquake) जाणवले. दिल्ली-एनसीआर, हरियाणा, पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये धक्के जाणवले. मात्र, या धक्क्यांची तीव्रता कमी होती. भूकंपाचे केंद्रस्थान अफगाणिनस्तान होते. या ठिकाणी भूंकपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आले. 


राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की,भूकंपाचा केंद्रबिंदू काबूलच्या ईशान्येला २४१ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दिल्ली आणि एनसीआरमधील लोकांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याचे सांगितले. त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. 








पाकिस्तानने काय म्हटले?


पाकिस्तानच्या हवामान खात्याने (पीएमडी) सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या हिंदुकुश भागात होता. स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:20 वाजता सहा रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्याचे केंद्र हिंदुकुश प्रदेशात 213 किलोमीटर खोलीवर होते.