Earthquake In Andaman Nicobar Islands : अंदमान निकोबार बेटांवर (Andaman and Nicobar Island) गुरुवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, (National Center for Seismology) अंदमान आणि निकोबार बेटांमधील पोर्ट ब्लेअरच्या भागात (10 November) आज रात्री 2:29 वाजता 4.3 तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाची खोली जमिनीखाली 10 किमी होती.


कोणतीही हानी नाही


या भूकंपामुळे कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. यापूर्वी 2 आणि 3 सप्टेंबर रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर भूकंपाचे धक्के जाणवले होते, ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे 4.9 आणि 4.4 इतकी मोजली गेली होती. याच्या एक दिवस आधी, म्हणजेच 9 नोव्हेंबरला पहाटे 1:58 च्या सुमारास, दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 मोजली गेली, ज्याचा केंद्र नेपाळमध्ये होता. 


 






नेपाळच्या भूकंपामुळे 6 जणांचा मृत्यू


दरम्यान, काल 8 नोव्हेंबरला नेपाळमध्ये डोटी शहरामध्ये झालेल्या भूकंपामुळे वेगवेगळ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला. याआधी रात्री उशिरा भारतात अनेक ठिकाणी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भारतातील दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, उत्तराखंड, दिल्ली, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील अनेक शहरांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता. 


भूकंप का होतो?


पृथ्वीचा वरचा पृष्ठभाग टेक्टोनिक प्लेट्सचा बनलेला आहे. या प्लेट्स जेव्हा एकमेकांवर आदळतात, तेव्हा त्या ठिकाणी भूकंपाचा धोका असतो. तर, जेव्हा या प्लेट्स एकमेकांच्या क्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न करतात तेव्हा भूकंप होतो. जेव्हा प्लेट्स एकमेकांवर घासल्या जातात, तेव्हा त्यातून प्रचंड ऊर्जा बाहेर पडते. त्या घर्षणामुळे पृथ्वी हादरायला लागते, ज्यामुळे भूकंप होतात.


संबंधित बातम्या


Nepal Earthquake : भूकंपामुळे ढिगाऱ्यात गाडले 6 जण, रात्रीच्या थंडीत नागरिकांचे हाल, पाहा फोटो