अमरावती : साधारणपणे दिवाळीसारखा सण तोंडावर येताच काजू, बदाम, अंजीर, अक्रोड आदी सुक्या मेव्याच्या पदार्थांच्या भावात वाढ होते. कारण या दरम्यान विविध प्रकारच्या मिठाईची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या दरम्यान सुक्या मेव्याचे पदार्थ मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतात.
दिवाळी निमित्त नागरीक ऐकमेकांना मोठ्या प्रमाणात मिठाईसह सुक्या मेव्याचे बॉक्स भेट म्हणून देतात. यावर्षी सुक्या मेव्याचे भाव ऐन सणाच्या मुहूर्तावर कमी झाले आहे. बदाम 1200 रुपये किलोवरुन 700 रुपयावर घसरले आहे. इतर सुक्या मेव्याच्या वस्तूंचे भावही कमी झालेले आहेत. उल्लेखनीय असे की, गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सुख्या मेव्याचे दर अपेक्षेपेक्षा वाढले होते. मात्र आता वाढलेले दर कमी झाले आहेत.
सध्या, बदामचे दर 1200 रुपयावरुन 700 रुपये प्रतिकिलोवर घसरले आहे. तर कॅलीफोर्निया बदामाचे दर 1100 रुपयावरुन 650 प्रति किलोवर आले आहे. तर अंजीराचे भावही 1200 रुपये प्रति किलोवरुन 900 रुपयावर आले आहे. सोबतच काजू 1000 वरुन 850 रुपये किलोवर आला आहे. पिस्ता पण 1200 वरून आता 950 वर आला आहे. या ड्रायफूटच्या दरामध्ये घसरण झाल्याने सर्वसामान्य आनंदीत आहे.
सुक्या मेव्याचे दोन महिन्यांपूर्वीचे आणि आत्ताचे दर
आजचे दर | पूर्वीचे दर | |
काजू | 840 | 1000 |
बदाम | 700 | 1200 |
अंजीर | 1200 | 900 |
किशमिश | 280 | 360 |
पिस्ता | 950 | 1200 |
पेंड खजूर | 80 | 120 |
चारोळी | 1050 | 1200 |