DRDO New Chief : डॉ समीर वेंकटपती कामत यांची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओचे ( DRDO - डिफेंस रिसर्च अँड डेवेलपमेंट ऑर्गेनायझेशन ) प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  (Samir V Kamat appointed DRDO Chairman) डीआरडीओचं सध्याचे अध्यक्ष जी. सतीश रेड्डी यांना संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 






डॉक्टर समीर कामत यांनी 2017 मध्ये डीआरडीओमध्ये नौदल प्रणालीमध्ये महासंचालक (NS&M) म्हणून पदभार स्वीकारला होता. डॉ. कामत यांनी 1985 मध्ये आयआयटी खरगपूरमधून मेटलर्जिकल इंजिनिअरिंगमधून बी.टेकची (ऑनर्स) पदवीचं शिक्षण घेतलं. 1988 मध्ये त्यांनी अमेरिकामधील ओहियो स्टेट यूनिवर्सिटीमधून साहित्य विज्ञान आणि इंजिनिअरिंगमधून (Materials Science and Engineering) डॉक्टरेटचं शिक्षण घेतलं. mechanical behaviour of materials यामध्ये कामत याचं विशेष प्राबल्य आहे. डॉ. कामत यांनी 1989 मध्ये डीआरडीओमध्ये वैज्ञानिक 'सी' पदावर कार्यभार सुरु केला होता.  2013 मध्ये ते ओएस/एससी 'एच' या पदापर्यंत पोहचले. त्यानंतर 17 ऑगस्ट 2015 मध्ये त्यांनी प्रयोगशाळा संचालक म्हणून कार्यभार सांभाळला. 2017 मध्ये डीआरडीओमध्ये नौदल प्रणालीमध्ये महासंचालक (NS&M) म्हणून पदभार स्वीकारला होता. आता त्यांची निवड डीआरडीओ प्रमुख म्हणून झाली आहे. मागील 25 वर्षांमध्ये डॉ. कामत यांनी सूक्ष्म प्रबलित धातू मॅट्रिक्स कंपोजिट्स, सिरेमिक मॅट्रिक्स कंपोझिट्स, अॅल्युमिनियम-लिथियम मिश्र धातू, उच्च शक्ती अॅल्युमिनियम मिश्र धातू आणि टायटॅनियम मिश्र धातू यांसारख्या प्रगत सामग्रीमध्ये मायक्रोस्ट्रक्चर-मेकॅनिकल प्रॉपर्टी कॉरिलेशनच्या क्षेत्रात डॉक्टर कामत यांनी काम केले आहे. ज्यामुळे विविध संरक्षण अनुप्रयोगांसाठी विकास झाला आहे.    


डीआरडीओ  आणि संशोधनामधील योगदानामुळे डॉ. कामत यांना अनेक पुरस्कारानं गौरवण्यात आले आहे. 1986 मध्ये मायनिंग, जियोलॉजिकल अॅण्ड मेटलर्जिकल इंस्टिट्यूट ऑफ इंडियाकडून कामत यांना इंद्रनील पदक देण्यात आलं होतं. तर 1998 मध्ये डीआरडीओ यंग सायंटिस्ट पुरस्कार प्राप्त झाला होता. 2006 मध्ये इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मेटल्सयांच्याकडून सुवर्णपदक मिळाले होते. 2008 मध्ये इस्पात मंत्रालयद्वारा नॅशनल मेटलर्जिस्ट्स डे मेटलर्जिस्ट ऑफ द ईयर पुरस्कारानं गौरवण्यात आलं.  2009 मध्ये नॅशनल सायन्स डे ओरेशन सिलिकॉन पदक मिळालं. 2012 मध्ये डीआरडीओ सायंटिस्ट ऑफ द ईयर पुरस्कार मिळाला. आयआयटी खरगपुर डिस्टिंगुइश्ड एलुम्नी पुरस्कारानं 2018 मध्ये त्यांना गौरवण्यात आले.