DRDO : संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात डीआरडीओने (DRDO) मंगळवारी ओडिशाच्या चांदीपूर किनार्याजवळ असलेल्या इंटिग्रिटी टेस्ट रेंजवर कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणाली क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. क्षेपणास्त्राची ही चाचणी ग्राउंड बेस्ड मॅन पोर्टेबल लाँचरवरून करण्यात आली. ही चाचणी पूर्णपणे यशस्वी झाल्याची माहिती डीआरडीओने दिली आहे.
DRDO ने सलग दोन यशस्वी चाचण्या केल्या आहेत. जमिनीवरून हवेत शत्रूच्या हवाई उड्डाणांना लक्ष्य करणे या क्षेपणास्त्रामुळे शक्य होणार आहे. विशेषत: हाय-स्पीड मानवरहित विमानाने ही चाचणी घेण्यात आली. डीआरडीओने दिलेल्या माहितीनुसार, अत्यंत कमी पल्ल्याच्या हवाई संरक्षण प्रणाली क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. क्षेपणास्त्राची चाचणी जमिनीवर आधारित मॅन पोर्टेबल लाँचरने करण्यात आली. यावेळी क्षेपणास्त्राने विमानाच्या जवळ आणि परत येण्याची ट्रायल यशस्वी केली.
एलसीए तेजससह स्वदेशी पॉवर टेक ऑफ शाफ्टची पहिली चाचणी यशस्वी
लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजससह स्वदेशी पॉवर टेक ऑफ (PTO) शाफ्टचीही उड्डाण चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाली. मंगळवारी बंगळुरूमध्ये ही चाचणी करण्यात आली. विशेष म्हणजे, पीटीओ शाफ्ट हे एक महत्त्वाचे उपकरण आहे, जे गिअरबॉक्सला विमानाच्या इंजिनला जोडून चालवले जाते.
संरक्षण मंत्रालयानेही याबाबत एक निवेदन जारी केले आहे. पीटीओ शाफ्टची पहिली चाचणी एलसीए तेजस एलएसपी-3 विमानावर यशस्वीपणे पूर्ण झाली, असे निवेदनात म्हटले आहे. या चाचणीसह, DRDO ने जटिल हाय-स्पीड रोटर तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी करून एक मोठा टप्पा गाठला आहे. हे तंत्रज्ञान काही देशांमध्येच उपलब्ध आहे. कॉम्बॅट व्हेईकल रिसर्च आणि DRDO, चेन्नई यांनी PTO शाफ्ट स्वदेशी डिझाइन आणि विकसित केले आहे.
महत्वाच्या बातम्या