NEET PG 2023 Result : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झाम्स इन मेडिकल सायन्सेसने (NBEMS) NEET PG 2023 परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाइन पद्धतीने पाहता येणार आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी नीट पीजी 2023 चा निकाल जाहीर झाला असल्याची माहिती ट्वीटद्वारे दिली. आरोग्यमंत्र्यांनी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. NBEMS ने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली असून परीक्षेचे आयोजन आणि निकाल यशस्वीपणे जाहीर केले असून त्यांचे कौतुक वाटत असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी म्हटले.
यावर्षी सुमारे 2.9 लाख विद्यार्थ्यांनी NEET PG परीक्षेला बसण्यासाठी नोंदणी केली होती. NEET-PG 2023 ही परीक्षा 2023-24 या शैक्षणिक वर्षात या MD/MS/DNB/डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 5 मार्च 2023 रोजी परीक्षा घेण्यात आली.
असा पाहा निकाल :
NEET-PG 2023 विद्यार्थ्यांना NBEMS चे संकेतस्थळ https://natboard.edu.in/ आणि https://nbe.edu.in इथे निकाल पाहता येतील.
तुमचा NEET PG 2023 चा निकाल पाहण्यासाठी ही थेट लिंक आहे: https://drive.google.com/file/d/1FExNVzTiT2WKwAvt0obu0c6cGuzVkTUb/view
NEET PG 2023 मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना आपल्या निकालाची प्रत 25 मार्च 2023 रोजी किंवा त्यानंतर https://nbe.edu.in/ वेबसाइटवरून डाउनलोड करता येणार आहे.
NEET PG 2023 ची गुणवत्ता यादी
NEET-PG 2023 साठी MD/MS/DNB/डिप्लोमा अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी किमान पात्रता/पात्रता निकषांनुसार, विविध श्रेणींसाठी कट-ऑफ स्कोअर खालीलप्रमाणे आहेत:
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI