Bombay Hight Court : विनयभंगासंदर्भात मुंबई हायकोर्टाने महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे. कोणताही लैंगिक उद्देश (Sexual Intent) नसताना एखाद्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीच्या पाठ किंवा डोक्यावरुन हात फिरवला तर त्याला विनयभंग अथवा मुलीच्या विनयशीलतेला धक्का मानता येणार नाही अशी टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर (Nagpur bench of Bombay High Court) खंडपीठाने केली आहे. या टिप्पणीसोबतच न्यायालयाने एका प्रकरणातील 28 वर्षीय तरुणाची शिक्षादेखील रद्द केली. गुन्हा दाखल झाला त्यावेळी हा तरूण 28 वर्षांचा होता तर तक्रारदार मुलगी 12 वर्षांची होती. दहा वर्षानंतर तरूणाची विनयभंगाच्या आरोपातून निदोर्ष मुक्तता करण्यात आली आहे. 


काय आहे प्रकरण?


मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर 2012 मधील एक प्रकरण सुनावणीला आले होते. 2012 मध्ये एका 18 वर्षीय एका तरुणावर 12 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित तरूणाने पीडित तरूणीच्या पाठीवर आणि डोक्यावर हात फिरवल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी पीडित मुलगी अल्पवयीन होती. 


15 मार्च 2012 रोजी हा तरूण 18 वर्षांचा होता. तो काही कागदपत्रे देण्यासाठी पीडितेच्या घरी गेला होता. त्यावेळी पीडिता घरी एकटी होती. त्यावेळी तरूणाने तिच्या पाठीवरून आणि डोक्यावरून हात फिरवत तू आला मोठी झाली असे म्हटले. यावेळी पीडित मुलीला भीती वाटल्याने तिने मदतीसाठी आरडाओरड केली. या घटनेनंतर पीडितेने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या तक्रारीनंतर तरूणावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर ट्रायल कोर्टाने त्याला दोषी ठरवून सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. ट्रायल कोर्टाच्या या निर्णयाला तरूणाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यावर आज सुनावणी पार पडली.  


2012 मधील या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकल खंडपीठाने आरोपीवरील दोषारोप हटवताना म्हटले की, "कृत्य करताना आरोपीचा कोणताही लैंगिक हेतू नव्हता आणि त्याच्या बोलण्यावरून असे दिसून येते की त्याने पीडितेला लहानपणी पाहिले होते. एखाद्या महिलेला विनयशीलतेला धक्का पोहोचण्यासाठी आरोपीने विनयभंग करताना तसा उद्देश ठेवलेला असायला पाहिजे. आरोपीवर ठेवण्यात आलेले आरोप त्यासाठी पुरेसे नाहीत. केवळ डोक्यावरुन आणि पाठीवरुन कोणताही लैंगिक उद्देश नसताना हात फिरवणे म्हणजे विनयभंग म्हणता येणार नाही."
 
"पीडित मुलीने आरोपीने केणताही वाईट शब्द बोलल्याचे म्हटले नाही. फक्त ती त्याच्या कृत्यामुळे काहीशी अस्वस्थ झाली असे दिसते. विनयभंग झाल्याचा किवा पीडितेच्या विनयशिलतेला धक्का पोहोचल्याचे सिद्ध करण्यास फिर्यादी अपयशी ठरल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. 


महत्वाच्या बातम्या 


Maharashtra Kesari : महिला कुस्तीपटूंसाठी खुशखबर! सांगलीत रंगणार महिलांची पहिली महाराष्ट्र केसरी स्पर्धा