नवी दिल्ली: कविता शब्दांनी आणि शब्दांच्या संयोगाने होत नाहीत, उलट शब्दांच्या जंजाळात वास्तवाचं प्रतिबिंब दाखवते, असं कुठंतरी वाचलं होतं. ज्यावेळी हिंदी कविता फक्त एखाद्या पुस्तकांमध्ये आणि विशेष करुन एखाद्या विशिष्ट घटकांमध्येच मर्यादित राहिली होती. त्यावेळी कुमार विश्वाससारख्या नव्या दमाच्या तरुण कवीने आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांना कवितांच्या जगताकडे खेचून आणले. आता हेच कुमार विश्वास एबीपी न्यूजच्या माध्यमातून महान कवींच्या कवितांना तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. 5 नोब्हेंबरपासून एबीपी न्यूजचा 'महाकवि'हा शो सुरु होत आहे. याच धर्तीवर कार्यक्रमाचे मुख्य कुमार विश्वास यांच्याशी साधलेला संवाद.


प्रश्न: एबीपी न्यूजच्या महाकवी या शोचं असं काय वैशिष्ठ्य आहे, ज्याने कवितांच्या जगाकडे प्रेक्षक आकर्षित होतील? महाकवीसारख्या कार्यक्रमाची खरंच गरज आहे का?

उत्तर: मी जवळपास तीन दशकांपासून हिंदी कवितांचा वाचक आहे. जवळपास दोन दशकांपर्यंत विश्वविद्यालयातून हिंदी शिक्षणशी जोडलो गेल्याने, स्वत:ला भाग्यशाली समजतो. कारण मी माझ्या मातृभाषेच्या सदैव सहवासात राहिलो. मात्र, आजचा एक मोठा वर्ग असाही आहे, जो प्राथमिक शिक्षण किंवा दहावी अथवा बारावीनंतर हिंदी कवितांपासून दूर लोटला आहे. जीवनातील अनेक चढ-उतारात स्वत:ला गुरफटून घेतल्याने, त्याला कथा-कवितांचा विसर पडला आहे. त्याच्यासाठी दिनकर, निराला, प्रेमचंद हे सर्व फक्त नावापूरतेच उरले आहेत.

मी जेव्हा देश-विदेशात अनेक लाईव्ह कार्यक्रमात स्वत:च्या कवितांसोबतच या सर्व दिग्गज कवींच्या कविता सादर करतो. तेव्हा प्रेक्षकांकडूनही चांगली दाद मिळते. प्रेक्षकांशी थेट संपर्कातून मला एक जाणवली, ती म्हणजे, टेलिव्हिजनसारख्या सशक्त माध्यमातून त्या महानकवींच्या कविता आणि त्यांच्या जीवनातील अनेक पैलू प्रेक्षकांसमोर अतिशय मनोरंजक आणि संगीतबद्ध स्वरुपात उलगडता येतील. यातून हिंदी भाषेप्रति कृतज्ञताही व्यक्त होईल, आणि त्या कवितांचे महत्त्वही वाढेल. या उद्देशानेच 'महाकवि' हा कार्यक्रम सुरु करण्यात येत आहे.

या कार्यक्रमात आपण अशा महान कवींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी कवितांना एक नवा आयाम दिला. यामध्ये त्यांची कथाही असेलच, शिवाय त्यांच्या जीवनाशी संबंधित अनेक रंजक घटनांचा समावेश असेल. जे सर्वसामान्य प्रेक्षकांनाही माहित नसेल. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, संगीत. या सर्व कवींच्या प्रमुख कवितांना मी कम्पोज करुन माझ्या टीमकडून संगीतबद्ध करुन घेतल्या आहेत.

एकूणच हे असे पॅकेज आहे, ज्यात मनोरंजनही आहे, माहितीही आहे, रंजकपणाही आहे आणि त्या महान कवींना या पिढीकडून दिलेली एक आदरांजलीही आहे. 5 नोब्हेंबरपासून याची शृंखला सुरु होत असून, हा प्रयत्न प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला आवडेल, अशी माला आशा वाटते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, यामध्ये सर्वसामान्य प्रेक्षकांनाही माहित नसेल, अशी माहिती असणार आहे.

प्रश्न: या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण याचे संगीत असेल, असं तुम्ही म्हणालात. पण जेव्हा पुस्तकं किंवा प्रिंट मीडियाचं माध्यमच उपलब्ध नव्हतं, तेव्हा लोक ऐकून ते मनात साठवत, अन् नंतर संपूर्ण जगात या कवितांचा प्रसार होत असे. इथं पुराणकाळापासून वेदांचंही अतिशय लयबद्ध पद्धतीत पठण केलं जातं. मात्र, पुस्तकांच्या निर्मितीनंतर कवितांचेही पठण सुरु झाले. त्यामुळे कवितांची जी एक लय असते. ती आजच्या युगात संगीतबद्ध केल्यानंतर नष्ट होईल, आणि त्यातलं मर्मही नाहीसं होईल असं तुम्हाला वाटतं का?

उत्तर: 'लया' बद्दल सांगायचे तर, यातील एक रंजक सत्य असे आहे की, निरालाजींनी मुक्त छंदातील कवितांची सुरुवात केली. त्यानंतर अज्ञेयसारख्या कवींनी हा वारसा पुढे चालवला. मात्र, त्यांच्या मुक्त छंद कवितांमध्ये एकप्रकारची लय होती. पण या दोन्हीमध्ये फरक इतकाच आहे की, पारंपरिक कवितांमध्ये शब्दात्मक विधान असते. तर मुक्त छंद कवितांमध्ये केवळ भावनेला महत्त्व असतं. तेव्हा लयपासून कोणाचीही सुटका नाही हे लक्षात घ्या. उदाहरणादाखल सांगायचे तर, एखाद्या व्यक्तीमधला महत्त्वाचा आवयव म्हणजे हृदय! पण त्याच्या ठोक्यांमध्येही एकप्रकारची लय असते. जेव्हा हृदयाचे ठोके थांबतात, तेव्हा त्या व्यक्तीला रुग्णालयात भरती करावं लागतं. आपण या लयेलाच संगीताची जोड दिली आहे.

यामुळे या कविता जेव्हा ऐकण्यास किचकट वाटत होत्या, त्या संगीतबद्ध केल्याने कर्णप्रिय झाल्या आहेत.

प्रश्न: इंदुजी, इंदुजी तुम्हाला काय झालं. सत्तेच्या मस्तीत बापालाही विसरलात? अशा जळजळीत कवितांकडे वर्तमान स्थितीतून तुम्ही कसं पाहता? हिंदी कविता सत्ता सुविधाभोगी झाल्या आहेत का?

उत्तर: खरं सांगायचं तर, कवितांच्या लेखनशैलीत नक्कीच बदल झाला आहे. जसे की, कबीराच्या दोह्यांनी प्रतिकात्मक स्वरुपातील तत्कालिन जीवनाचे प्रतिबिंब डोळ्यासमोर उभे केले. मात्र, आजचा कवी आपल्या कवितांमधून तेच सांगत असेल, तर माहित नाही काय होईल.

उदाहरणादाखल सांगायचे तर, दिनकरजींनी ज्याप्रकारे संसदेच्या सदनात आपल्याच पक्षाचे वरिष्ठ नेते आणि तत्कालिन पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंना खडेबोल सुनावत कविताच सादर केली. 'रे रोक युद्धिष्ठिर को न यहा'. तिच आजच्या सद्यपरिस्थितीत सादर करायची तर हे शक्य नाही. कारण सांगणाऱ्यात याची हिंमत नाही, आणि ऐकणाऱ्यामध्ये याबाबतचे धाडस नाही. बाबा नागार्जुनच्या अनेक कवितांबाबत असेच काहीसे होते. त्यामुळे वेळेनुसार, कवितांच्या स्वरुपातही बदल झाला हे नक्की!

प्रश्न: बाजारीकरणचा सामना साहित्य क्षेत्र कसे करेल? दुसरं म्हणजे, बाजारीकरणासोबत कवितांनी गळ्यात गळे घालून, किंवा हातात हात घालून चालणे योग्य आहे का?

उत्तर: वैयक्तिक मत सांगायचं, तर माझ्या कवितांवर बाजरीकरण कधीही हावी झालं नाही. मी कवितांसाठी बाजार नक्कीच उपलब्ध करुन दिला. मात्र, मी कधीही मार्केटच्या गरजेनुसार कविता लिहली नाही. साहित्य आणि बाजार हे दोन्हीही वेगवेगळे आहे. मात्र, जर साहित्याचा बाजार मांडला, तर यात चुकीचं काहीच नाही. कारण निराला, नागार्जुन आणि अदमसारख्या कवींना त्यांच्या शेवटच्या काळात आपण वाऱ्यावर सोडलं नाही का?  बाबा नागार्जुनांनी निरालाजींना सांगितलं ही होतं की, 'उसे मरने दिया हमने, रह गया घुटकर पवन, अब भले ही याद मे करते रहे सौ-सौ हवन,' तेव्हा साहित्यकार गरिबीत मेला तरीही त्याला उत्कृष्ठ मानणं हेही कितपत योग्य आहे? आज एबीपी न्यूज हिंदी कवींवर इतका मोठा कार्यक्रम करण्याचा विचार करतो, तर बाजाराशिवाय हे शक्य आहे का? यातून साहित्य बाजारासाठी पूरक होऊन सकारात्मकतेकडे वाटचाल करेल.

प्रश्न: कोणत्या कवींबद्दल या शोमध्ये माहिती दिली जाईल?

उत्तर: या शृंखलेसाठी एकूण दहा कवींची निवड करणे सर्वात कठीण काम होते. कारण हिंदी या मातृभाषेचा आवकाश इतका मोठा आहे, त्यामध्ये अगणिक तारे सामावलेले आहेत. भाषा आणि माताही उंबऱ्याच्या आत नव्हे, तर मुला-मुलींमधून विकसीत होतात, हे मी नेहमी सांगतो. पण दहाच कवींची निवड करायची असल्याने, यावर पुष्कळ चर्चा करुन काही महाकवींचीच निवड करावी लागली. यात दिनकर, दुष्यंत, निराला, बाबा, नागार्जुनसारखे काही दिग्गज कवींबद्दल तुम्हाला कार्यक्रमातून जाणून घेता येईल. ही शृंखला आणखी वाढवण्याचा प्रयत्न नक्की असेल. त्यामुळे प्रेक्षकांसोबत मीही 5 नोव्हेंबरची वाट पाहात आहे. ज्या दिवशी ही शृंखला सुरु होईल, तेव्हा मी या महाकवींबद्दल कृतज्ञता व्यक्त करु शकेन, असं मला वाटतं.