नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येत आहे. या दौऱ्यात ट्रम्प अहमदाबादला भेट देणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या जोरदार तयारी सुरू आहे. ट्रम्प पंतप्रधान नरेंद्र मोदी साबरमती नदी किनाऱ्यावरील गांधी आश्रमचा दौरा करणार आहे. ट्रम्प या आश्रमचा दौरा करणारे पहिले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहे. या दौऱ्यात ते जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचा उद्घाटन करणार आहे. डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यात काय करणार आहे.

24 फेब्रुवारीचा डोनाल्ड यांचा कार्यक्रम

12.00 : दुपारी 12 वाजता डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार. पंतप्रधान नरेद्र मोदी त्यांना घेण्यासाठी अहमदाबाद एअरपोर्टला जाणार आहे. यावेळी त्यांचा गार्ड ऑफ ऑनरने सन्मान करण्यात येणार आहे. त्यानंतर ते साबरमती आश्रमला भेट देणार आहे. साबरमती आश्रमात ते 20 मिनीटे थांबणार आहे.

1.15 : जगातील सर्वात मोठ्या मोटेरा स्टेडियमचे ते उद्घाटन करणार आहे. या वेळी नमस्ते ट्रम्प हा कार्यक्रम होणार आहे.

3.30 : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी आग्र्यासाठी रवाना होतील.

4.30 : ट्रम्प ताजमहाल पाहण्सासाठी जाणार आहे. त्यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सायंकाळी पाच वाजता ताजमहाल पाहण्यासाठी घेऊन जाणार आहे. ताजमहालला भेट दिल्यानंतर सायंकाळी 5.30 वाजता दिल्लीला येणार आहे.

25 फेब्रुवारीचा कार्यक्रम

सकाळी 9.00 : ट्रम्प यांचे राष्ट्रपती भवन येथे स्वागत

सकाळी 11.30 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे द्विपक्षीय चर्चा होईल. दरम्यान, मेलानिया ट्रम्प दिल्ली सरकारच्या शासकीय शाळेला भेट देणार आहे आणि मुलांना भेटणार आहे.

दुपारी 4 30 : अमेरिकेचे अध्यक्ष दूतावासातील कर्मचार्‍यांना भेट देणार आहे.

रात्री 8.00 : रात्री आठ वाजता राष्ट्रपती भवनात या दोघांसाठी जेवणाचे आयोजन केले आहे.

रात्री 10 : डोनाल्ड ट्रम्प दहा वाजता पत्नीसह जर्मनीला रवाना होणार आहे.

 
#HowdyModi | अमेरिकेत आज 'हाऊडी मोदी', डोनाल्ड ट्रम्पही कार्यक्रमाला उपस्थित राहणार | ABP Majha


 

संबंधित बातम्या : 

Viral : जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातमध्ये, BCCI कडून एरियल व्ह्यू फोटो शेअर

डोनाल्ड ट्रम्प भारतात येण्याआधी अमेरिकी सीक्रेट सर्व्हिसचे एजंट दाखल; दौऱ्यासाठी करणार नियोजन