उस्मानाबाद : जगातील सर्वात शक्तिशाली समजल्या जाणाऱ्या सेनेचे सुप्रीम कमांडर तथा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जेंव्हा भारतात येतील तेंव्हा त्यांच्या स्वागतासाठी भारतीय सैन्य दलाच्या वतीनेही वेगळ्या अंदाजात त्यांचे जोरदार स्वागत होणार आहे. अहमदाबाद विमानतळ ते राष्ट्रपती भवनापर्यंत भारतीय सैन्याच्या तुकड्या दिसणार आहेत.


24 फेब्रुवारीला दुपारी अहमदाबादच्या विमानतळावर अमेरिकन एअरफोर्स वन या विमानाने राष्ट्राध्यक्ष ट्रॅम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रॅप यांचे आगमन झाल्यांनतर ते जसे जसे रेड कार्पेट वरून पुढे चालतील तसं त्यांच्या दोन्ही बाजूंना भारताच्या तिन्ही दलाचे जवान मानवंदना देत उभे असतील. त्यातच प्रोटोकॅल तोडून स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्राध्यक्ष ट्रॅप यांच्या स्वागतासाठी विमानतळावर उपस्थित राहतील.


25 फेब्रुवारीला होणार ओपचारिक पद्धतीने स्वागत


25 फेब्रुवारीला दिल्ली येथे सकाळी 10 वाजता राष्ट्रपती भवनातील प्रांगणात राष्ट्राध्यक्ष ट्रंम्प यांचे औपचारिक स्वागत केले जाणार आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तिन्ही दलातील एकूण 9 मोटारसायकल स्वार असलेले जवान आऊट रायडर हॉटेल ते राष्ट्रपती भवन पर्यंत या खास पाहुण्यांच्या वाहनांना घेऊन जातील. तिथे महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघेही त्यांचे स्वागत करतील.


औपचारिक रित्या राजकीय स्वागत आणि सन्मान म्हणून या खास पाहुण्याच्या आगमना निमित्त 21 तोफांची सलामी हि देण्यात येणार आहे. तिथेच भारताच्या तिन्ही दलातील 150 सैनिकांच्या वतीने त्याच्या सन्मानार्थ गार्ड ऑफ ऑनर देण्यात येणार आहे. सूत्रानुसार राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या स्वागतासाठी देण्यात येणाऱ्या गार्ड ऑफ ऑनर ची जवाबदारी सेनेच्या एका लेफ्टनंट कर्नल रँक असलेल्या अधिकाऱ्यास देण्यात आली आहे. भारतीय सेनेचे बँड पथक ही अमेरिकेच्या राष्ट्रगीताची धून वाजवणार आहेत.


राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे एअरफोर्स 1 विमान व त्यांच्या सोबतीला आलेले अन्य सैन्य दलाचे विमान राजधानी दिल्ली येथील भारतीय वायू सेनेच्या पालम येथील टेक्निकल एअर बेस येथे थांबणार आहेत.


राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण अशी व्यवस्था


हॉटेल आणि आसपासच्या भागात पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा वाढवण्यात आलेली आहे. त्यांच्या सोबतीला पुढील दोन दिवस असलेल्या अमेरिकी सिक्रेट सर्व्हिसच्या सैनिकांचा ही राष्ट्राध्यक्ष हॉटेलमध्ये जिथून जातील येतील तिथे ही मोठा कडा पहारा असणार आहे.


नमस्ते ट्रम्प यासाठी येत असलेल्या राष्ट्राध्यक्षांना दिल्लीत अनेकदा ऐकायला मिळणार "नमस्ते"


असाही एक योगायोग किंवा संदेश म्हणावा लागणार आहे की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची दिल्लीतील ज्या खास हॉटेल मध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या हॉटेलची ओळखच नमस्तेच्या चिन्हात आहे. त्यातच राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या स्वागतापासून ते समारोपापर्यंत या हॉटेलात अनेक वेळा नमस्ते हे ऐकायला मिळणार आहे.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नीचे स्वागत भारतीय संस्कृती आणि परंपरेनुसार कपाळावर गंध लावत शाल देऊन करण्यात येणार आहे. इतकेच नाही तर नमस्तेचे विविध चिन्ह त्यांच्या स्वागतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दिसून येतील.


हॉटेल मध्ये विशेष अतिथींना मिळणार दिल्लीतील सगळ्यात स्वछ हवा


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांना दिल्लीतील त्यांच्या विशेष आरामगृहात इतर सोयीसुविधां बरोबरच स्वछ हवा मिळेल याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार पंचतारांकित सुविधा वापरणारे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासाठी ज्या हॉटेलची निवड करण्यात अली आहे. तेथील हवेची गुणवत्ता चांगली राहील, याची विशेष काळजी घेण्यात आलेली आहे.


सांगण्यात येत आहे की, आयटीसी मौर्या हॉटेलने काही दिवसांपूर्वी स्वीडिश हेपा या नवीन तंत्रज्ञानावर आधारित हवा शुद्ध करण्याचे यंत्र लावले आहे. त्यानुसार दावा करण्यात आला आहे की, जागतिक स्वास्थ संघटनेच्या मानकापेक्षा किती तरी चांगली हवा त्या यंत्रांच्या माध्यमातून उपलब्ध होते.


इतकेच नाही तर हवेची सतत गुणवत्ता निरीक्षण सुद्धा केले जात आहे. याचे प्रात्यक्षिक हॉटेल मधील लागलेल्या स्क्रिन वर वेळोवेळी पाहायला मिळत आहे. इथे लावण्यात आलेले मॉनिटर हेवेतील पर्टिक्युलेट मॅटरची मात्रा 15 पेक्षा कमी मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर पेक्षा कमी असल्याचे सांगितले जात आहे जे 25 मायक्रोग्रॅम प्रति घन मीटर या जागतिक स्वास्थ संघटनेच्या मानकानुसार खूप खाली आहे.


महत्वाचे म्हणजे काही वर्षांपासून दिल्लीमधील हवेतील वाढणाऱ्या धुळीकनांची मात्रा आणि रासायनिक गॅस हे विदेशी पाहुण्यांसाठी त्रास दायक होत आहे. जेंव्हा एखादा खुप महत्वाचा पाहूना येत असेल तर त्यात अजून अडचणी वाढत आहेत.


काही वर्षांपासून दिल्लीचा समावेश त्या शहरांमध्ये केला जात आहे. जेथे वर्षातील सर्वाधिक दिवस हवेची गुणवत्ता ही अत्यंत खराब असते. यामुळेच दिलीतील काही पंचतारांकित हॉटेलमध्ये स्वछ हवेच्या अनुषंगाने विशेष सुविधा देण्यावर मोठ्या प्रमाणावर भर दिला जातोय.


रुचकर जेवणाची ही केली जातेय विशेष तयारी


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा भारत दौरा हा केवळ 36 तासा पेक्षा कमी असला, तरीही ते दिल्लीत फक्त 12 तास असणार आहेत. या कमी वेळेतही राष्ट्रपती भवनातील औपचारिक स्वागत कार्यक्रम, हैद्राबाद हाऊसमधील द्विपक्षीय बैठक आणि दुपारचे जेवन ते रात्रीच्या जेवणापर्यंतचे अनेक कार्यकर्ते आहेत. अशात त्यांना आपल्या हॉटेलमध्ये थांबण्यासाठी कमी वेळ मिळणार आहे. परंतु तरीही पाहुण्याच्या आदर तिथ्यात कुठलीही कमतरता राहणार नाही. याची काळजी घेतली जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासाठी आयटीसी मौर्या हॉटेलच्या बुखारा रेस्टारेंटचा अनुभवी शेफ एक खास प्लेटर पण तयार करणार आहे. यात काय पदार्थ असणार आहेत याचा अजून तरी खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र राष्ट्रपती ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी 24 फेब्रुवारी रोजी रात्रीचे जेवण आणि 25 फेब्रुवारीला सकाळचा नाष्टा हॉटेल मध्ये करू शकतात.


महत्वाचे म्हणजे बुखारा हे दिल्लीतील एक बहू प्रतिष्ठित होते आहे ज्याचा मेन्यू मागच्या 40 वर्षांपासून एकच आहे. जो आजपर्यंत बदललेला नाहीये. तरीही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि त्यांची पत्नी या दोघांच्या आवडी निवडीचा विचार करून काही विशिष्ठ पदार्थांसहित एक खास प्लेटर तयार केले जाणार आहे.


2 दशकांपूर्वी म्हणजेच मार्च 2000 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या दौऱ्या दरम्यान त्यांची पत्नी हिलरी क्लिंटन यांच्या नावाने एक विशिष्ठ प्लेटर तयार करण्यात आले होते. तसेच 2009 आणि 2015 साली राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या दौऱ्यानिमित्ताने ही विशिष्ठ पदार्थानी प्लेट सजवण्यात आली होती.


संबंधित बातम्या : 


India-US | भारत आणि अमेरिकेच्या अध्यक्ष भेटीचा इतिहास


'नमस्ते इवांका'; डोनाल्ड ट्रम्पसोबत इवांका ट्रम्पही येणार भारतात


Namaste Trump | कार्यक्रम खासगी संस्थेचा, मग सरकारकडून कोट्यवधींचा खर्च का? : काँग्रेस

जाणून घ्या कसा असणार डोनाल्ड ट्रम्प यांचा भारत दौरा


Viral : जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम गुजरातमध्ये, BCCI कडून एरियल व्ह्यू फोटो शेअर


डोनाल्ड ट्रम्प भारतात येण्याआधी अमेरिकी सीक्रेट सर्व्हिसचे एजंट दाखल; दौऱ्यासाठी करणार नियोजन