जम्मू-कश्मीर : जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये पोलिस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. या कारवाईत मोठ्याप्रमाणवर शस्त्र आणि दारुगोळी देखील जप्त करण्यात आला.
जम्मू-काश्मीरमधील बिजबेहरा येथील संगम भागात ही चकमक झाल्याची माहिती जम्मू-कश्मीर पलिसांनी दिली. या कारवाईत लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचं पोलिसांनी सांगिलतलं. स्थानिक पोलिस, सीआरपीएफ आणि जवानांच्या संयुक्त पथाकाने ही कारवीई करण्यात आली आहे.
ज्यामध्ये दोन्ही बाजुंनी मोठ्याप्रमाणावर गोळीबार झाला, जवानांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरात लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. यावेळी घटनास्थळावरून मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा देखील हस्तगत करण्यात आला. दहशतवाद्यांनी शक्रवारी रात्रीपासूनच या परिसरात गोळीबार सुरू केला होता. यानंतर जवानांकडून संयुक्त मोहीम राबवण्यात आली. सध्या या भागात सर्च ऑपरेश करण्यात येतं आहे. या कारवाईत भारतीय जवानांना कोणतीही हानी पोहचली नाही.
जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Feb 2020 08:40 AM (IST)
जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा, मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. सध्या या भागात सर्च ऑपरेश करण्यात येतं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -