साबरमती आश्रमाला भेट दिल्यानंतर तिथल्या व्हिजिटर बुकमधे ट्रम्प यांनी लिहिलेला हा संदेश. संदेश जरा नीट वाचला तर येथे गांधी नावाचा शब्दही सापडणार नाही. त्याऐवजी परममित्र असं संबोधन करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना महात्मा गांधीबद्दल लिहायला दोन शब्दही सुचू नयेत? सहसा कुठल्याही महापुरुषांच्या स्मारकात जे व्हिजिटर बुक असते त्यात तिथं आल्यानंतर तुमच्या मनातल्या त्या महापुरुषाच्या भावना अपेक्षित असतात. त्या स्मारकाच्या दर्शनानं त्या महापुरुषाच्या कुठल्या आठवणी तुमच्या मनात जाग्या होतात याचंच ते प्रतिंबिंब. पण साबरमती आश्रमातल्या फेरफटका मारल्यानंतरही ट्रम्प यांच्या मनात मात्र गांधी काही रुजले नाहीत.
अहमदाबादमधील साबरमती आश्रम म्हणजे महात्मा गांधी यांच्या वास्तव्यानं पुनित झालेला परिसर आहे. आश्रमात कुणी परदेशी पाहुणा आला तरी बापूंच्या विचारांपुढे लीन होऊन, त्यांच्या अहिंसेच्या तत्वज्ञानापुढे थक्क होऊन जातो. याच्या आधीही अनेक महापुरुषांनी बापूंच्या आठवणींबद्दलचे शब्द अशा व्हिजिटर बुकमध्ये लिहिलेले आहेत.
अगदीच उदाहरण द्यायचे असेल तर बराक ओबामांनी काय लिहिलं होतं.
ओबामा यांनी लिहले होते, मार्टिन लूथर किंग यांनी जे सांगितले ते आजही सत्य आहे. गांधीजींचे विचार आजही भारतात जिवंत असून जगासाठी ही एक महान भेट आहे. आम्ही आशा करतो की, सर्व देशातील लोकांनी सत्य आणि प्रेमाची भावना आचरणात आणावेत.
#NamasteyTrump | आरेवाडी कवठे महाकाळच्या धनगर बांधवांचं नृत्य! #नमस्तेट्रम्प
संबंधित बातम्या :
#NamasteyTrump : पाकिस्तानने दहशतवादाचे अड्डे नष्ट करावेत : डोनाल्ड ट्रम्प
'माय ग्रेट फ्रेण्ड मोदी', साबरमती आश्रमात ट्रम्प यांचा अभिप्राय; गांधीजींचा उल्लेखही नाही