नवी दिल्ली : देशात जिथे जिथे हवा प्रदूषण आहे, तिथे तिथे फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हरित लवादाने हा निर्णय घेतला आहे. वाढतं प्रदूषण लक्षात घेत नॅशनल ट्रिब्युनल (एनजीटी) यांनी दिल्ली एनसीआरमध्ये आज मध्यरात्रीपासून, म्हणजेच 9 नोव्हेंबरपासून ते 30 नोव्हेंबरपर्यंत सर्व फटाक्यांच्या विक्रीवर आणि फटाके फोडण्यावर निर्बंध लावले आहेत. यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब एनजीटीच्याआदेशात आहे ती म्हणजे, केवळ दिल्लीतच नाही तर, ज्या ज्या शहरांमध्ये प्रदूषणाची पातळी वाढलेली आहे, त्या ठिकाणीही असाच आदेश लागू करण्यात यावा. त्यामुळे दिल्ली व्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये फटाक्यांसंदर्भात कोणता निर्णय घेतला जाणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
पाहा व्हिडीओ : देशात जिथे हवा प्रदूषण, तिथे फटाके फोडण्यास बंदी; राष्ट्रीय हरित लवादाचा निर्णय
राष्ट्रीय हरित लवादाने 18 राज्यांना पाठवल्या नोटीस
फटाक्यांवर बंदी आणण्यासाठी एनजीटीने देशातील 18 राज्यांना नोटीस पाठवून उत्तर मागितलं होतं. ज्यामध्ये जवळपास अर्ध्या राज्यांनी स्वतः फटाक्यांवर बंदी आणली होती. परंतु, उत्तर प्रदेशसह इतर राज्यांनी आतापर्यंत यासंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही.
दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेचा स्तर खराब
दिल्लीमधील हवेच्या गुणवत्तेचा स्तर सतत खराब असल्याचं निदर्शनास आलं आहे. अनेक भागांत AQI 400 च्या पार गेला आहे. दिल्लीमध्ये सकाळी अनेक ठिकाणी धुरके पसरलेलं असतात. तसेच संध्याकाळच्या वेळीही धुरकं पसरलेलं पाहायला मिळतं.
एक्यूआय (Air Quality Index) कसं मोजतात?
दरम्यान, 0 आणि 50 मध्ये एक्यूआयला 'उत्तम', 51 आणि 100 मध्ये 'संतोषजनक', 101 आणि 200मध्ये 'मध्यम', 201 आणि 300 मध्ये 'खराब', 301 आणि 400 मध्ये 'अत्यंत खराब' आणि 401 आणि 500 मध्ये 'गंभीर' समजलं जातं.
मुंबईत लक्ष्मीपूजनाचा दिवस वगळता फटाक्यांवर बंदी
'प्रकाशाचा आणि आनंदाचा सण' अशी ओळख असणारी 'दीपावली' आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. पंरतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लक्ष्मपूजनाचा दिवस वगळता फटाक्यांवर बंदी घातली आहे. लक्ष्मीपूजनाला केवळ खासगी क्षेत्रात सौम्य स्वरुपाच्या फटाक्यांना परवानगी असेल. सार्वजनिक ठिकाणी फटाके किंवा आतषबाजीला बंदी असेल. मुंबई महापालिकेने याबाबत नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्यांवर साथरोग नियंत्रण कायदा -1897 अंतर्गत कारवाई केली जाईल, असं महापालिकेने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :