Bihar Elections 2020 : संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या विळख्यात अडकलं आहे. अशातच कोरोना काळात पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल आज म्हणजेच, 10 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. कोरोना संकटातही बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये गेल्या निवडणुका म्हणजेच, 2015 साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या तुलनेत अधिक लोकांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. यंदा बिहारमध्ये एकूण 57.05 टक्के मतदान करण्यात आलं.


2015 मध्ये 56.66 टक्के मतदान


निवडणूक आयोगाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये 2015 मध्ये पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये 56.66 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला आहे. तसेच यावर्षी कोरोना संकटातही गेल्या निवडणुकीपेक्षा अधिक 57.05 टक्के मतदान झालं आहे. आकडेवारीनुसार, तीन टप्प्यांमध्ये संपलेल्या मतदानात यावर्षी महिला मतदारांची संख्या (59.69 टक्के), तर पुरुष मतदारांच्या (54.68 टक्के) तुलनेत अधिक होती.


पाहा व्हिडीओ : बिहारमध्ये सत्तांतराचे संकेत, सर्व एक्झिट पोल्सचा अंदाज, पाहा EXIT POLL



यंदा बिहार विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात सात नोव्हेंबर रोजी अपेक्षेपेक्षा अधिक मतदान झालं. ज्यामध्ये कोसी-सीमांचल, मिथिलांचल आणि तिरहुतमधील 15 जिल्ह्यांमधील 78 जागांचाही समावेश होता. तिसऱ्या टप्प्यातील मतदान जवळपास 60 टक्के झालं. तर पहिल्या टप्प्यात 55.68 टक्के आणि दुसऱ्या टप्प्यात मतदान 55.70 टक्के होतं.


Bihar Election Results : कसं आणि कुठे पाहू शकाल बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल?


लोकसभा निवडणुकांमध्ये 57.33 टक्के मतदान


गेल्या वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये 57.33 टक्के मतदान झालं होतं. कोरोना संकटात देशात पार पडणारी ही सर्वात मोठी निवडणूक आहे. तसेच या निवडणूकीत मतदान करण्यासाठी आयोगाने लोकांच्या सुविधेसाठी मतदान करण्यासाठी एक तास वाढवून दिला होता.


महत्त्वाच्या बातम्या :