Dhruv Rathee Wife : प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठी (Dhruv Rathee) याच्या घरी रविवारी (दि.22) गोंडस बाळाचे आगमन झाले. ध्रुव राठीच्या पत्नीने मुलाला जन्म दिलाय. सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स असलेल्या आणि सातत्याने चर्चेत असलेल्या ध्रुव राठीची पत्नीही सध्या चर्चेत आली आहे. जाणून घेऊयात ध्रुव राठीची विदेशी पत्नी (Dhruv Rathee Wife) आहे तरी कोण? 






सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ध्रुव राठीच्या घरी कालच गुड न्यूज आली. त्याला मुलगा झाल्याची बातमी त्याने सोशल मीडियावर अकाऊंटवरुन शेअर केली. एका मुलाखतीत ध्रुव राठीने त्याच्या पत्नीबद्दल भाष्य केले होते. ध्रुव राठी पत्नीबाबत बोलताना म्हणाला की, जुली (juli br) आणि मी पहिल्यांदा भेटलो तेव्हा आम्ही जवळपास 19 वर्षांचे होतो. 


ध्रुव राठीची विदेशी पत्नी कोण आहे? 


ध्रुव राठी (Dhruv Rathee Wife) आणि जुलीने (juli br) 24 नोव्हेंबर 2021 मध्ये लग्न केलं होतं. ध्रुव राठीने ऑस्ट्रियातील बेल्डविअर पॅलेसमध्ये जुलीसोबत लग्न केलं होतं. जुली मूळची जर्मनीची आहे. तिचा जन्म जर्मनीमध्ये झाला होता. ती मेडिकल फिल्डमध्ये काम करत होती. शिवाय ती स्वत: देखील एक युट्युब चॅनेल चालवते. 






दोघं एकाच कॉलेमध्ये शिकत होते


जुलीने तिचं शिक्षण जर्मनीमध्येच पूर्ण केलं. ध्रुव आणि जुलीची पहिली भेट जर्मनीतील कार्लजूए इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजीमध्ये झाली. दोघं त्यावेळी जर्मनीमध्ये शिक्षण घेत होतं. त्यामुळे कॉलेज लाईफपासून दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. 


ध्रुव राठी पहिल्यांदा जुलीला भेटला तेव्हा त्याला अवघडल्यासारखं वाटत होतं. ध्रुव राठी जुलीला भेटत असताना लाजत होता. त्यानंतर दोघांच्या सातत्याने भेटीगाठी सुरु झाल्या होत्या. त्यानंतर दोघांमध्ये सातत्याने बोलणं सुरु होतं. त्यानंतर दोघांमध्ये लग्नाबाबतची बोलणीही सुरु झाली. दोघं एकमेकांना डेटही करत होते. 






इतर महत्वाच्या बातम्या 


Dhruv Rathee : प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीची संपत्ती किती? एका महिन्यात किती कमावतो?