Dhruv Rathee Net worth : प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठी (Dhruv Rathee) याच्या घरी नुकतीच गुड आलेली पाहायला मिळाली. ध्रुव राठी (Dhruv Rathee) याच्या पत्नीने नुकताच एका गोंडस मुलाला जन्म दिलाय. याबाबतची गुड न्यूज राठीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केली आहे. शिवाय त्याने मुलीचे फोटोही शेअर केले आहेत. ध्रुव राठीची (Dhruv Rathee) पत्नी मूळची जर्मनीची आहे आणि सध्या राठीही जर्मनीत राहतो. 




ध्रुव राठीची संपत्ती किती? एका महिन्यात किती कमावतो?


मीडिया रिपोर्ट्सनुसार ध्रुव राठीची नेटवर्थ सात मिलियन डॉलर्सपेक्षा अधिक आहे. ध्रुव राठी प्रसिद्ध युट्युबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. तो महिन्याला जवळपास 40 ते 50 लाख रुपये कमावतो. त्याच्या युट्युब चॅनेलला 25 मिलियन पेक्षा अधिक सबस्क्राईबर आहेत. ध्रुव राठी पर्यावरण, राजकारण आणि सामाजिक क्षेत्राबाबतच्या विषयांवर व्हिडीओ बनवतो. 




कोण आहे ध्रुव राठी ?


ध्रुव राठी सध्या युट्युबवर एक चॅनेल चालवतो. या चॅनेलवर तो राजकीय, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विषयांवर विस्तृतपणे भाष्य करतो. अनेकदा ध्रुव राठीने राजकीय क्षेत्राबाबत त्याचे विचारही व्यक्त केले आहेत. युट्युब चॅनेलशिवाय तो ट्रॅव्हल ब्लॉगही सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याने ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये त्याच्या लग्नाचा व्हिडीओ अपलोड केला होता. ध्रुव राठी याबाबत बोलताना म्हणाला होता की, माझी जर्मन सहचारिणी एलबीआर हिच्यासोबत सात वर्षे सोबत राहिला. त्यानंतर 2021 मध्ये ध्रुव राठीने ऑस्ट्रियामध्ये लग्न केले होते. लोकसभा निवडणुकीवेळी त्याने देशात हुकूमशाही आणली जात आहे का? असा सवाल करत मोदी सरकारच्या विरोधात आवाज उठवला होता. 




इतर महत्वाच्या बातम्या


Mahayuti Crisis: भाजप-राष्ट्रवादीत तेढ! आता अजित पवार गटाचा ठराव; भोसरी-चिंचवडवर सांगितला दावा, महायुतीत वाद चव्हाट्यावर