RBI MPC Meeting : RBI ची बहुप्रतिक्षित चलनविषयक धोरण समितीची बैठक (Monetary Policy Committee) आज संपली. या बैठकीत रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor shaktikanta das)  यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 2024-25 या आर्थिक वर्षाच्या पूर्ण अर्थसंकल्पापूर्वी हा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो दरात शेवटचा बदल करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर तो 6.5 टक्के करण्यात आला होता. तेव्हापासून दर स्थिर आहेत.


गेल्या 16 महिन्यांपासून रेपो दर स्थिर


चलनविषय धोरण समितीच्या बैठकीत रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं गेल्या 16 महिन्यांपासून रेपो दर स्थिर आहेत. त्यामुळं सध्या रेपो दर अजूनही 6.5 टक्क्यांवर स्थिर आहेत. रिझर्व्ह बँकेच्या शक्तिशाली चलनविषयक धोरण समितीची ही सलग 8वी बैठक असून, ज्यामध्ये रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सेंट्रल बँकेच्या एमपीसीने फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो दरात शेवटचा बदल केला होता. .


लोकांच्या ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही


रेपो दरात कोणताही बदल न केल्यामुळं लोकांच्या ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही. रेपो दरात कोणताही बदल न केल्यामुळं व्याजदरात कपातीची अपेक्षा करणाऱ्यांची निराशा झाली आहे. तर दुसरीकडं ही घोषणा त्या गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी आहे ज्यांनी FD मध्ये पैशांची गुंतवणूक केली आहे. उच्च रेपो दरामुळं FD वर जास्त व्याजाचा लाभ मिळत राहील.


रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?


रेपो रेट म्हणजे काय? असा सर्वांनाच प्रश्न पडला असेल. तर ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेतात तो दर म्हणजे रेपो रेट. रेपो रेट वाढणे म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं. तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणे. तर आरबीआय ज्या दराने इतर बँकांकडून पैसे घेते तो दर म्हणजे रिव्हर्स रेपो रेट.


बैठकीनंतर काय म्हणाले रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास?


रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बैठकीनंतर दिलेल्या माहितीनुसार, आम्ही आर्थिक परिस्थितीचा आढावा घेतला. यामध्ये चलनविषयक धोरण समितीने रेपो दर स्थिर ठेवण्याचा बहुमताने निर्णय घेतला आहे. एमपीसीच्या 6 पैकी 4 सदस्यांनी रेपो दरात बदल न करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शक्तिकांत दास यांनी दिली. या समितीने रेपो दर 6.50 टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


महत्वाच्या बातम्या: