नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर खात्यावर जमा होत असलेल्या पैशांवर सरकारची करडी नजर आहे. मात्र त्याचवेळी राजकीय पक्षांना सरकारने भलतीच सूट दिली आहे. कारण राजकीय पक्षांच्या खात्यात जमा होणाऱ्या 500 आणि हजाराच्या जुन्या नोटांवर कोणताही टॅक्स लागणार नाही.
एकतर राजकीय पक्षांना पहिल्यापासूनच आयकर कायद्यातून सूट आहे. त्यातच नोटाबंदीनंतरही त्यांच्या खात्यावर कितीही नोटा जमा झाल्यास, त्यांना कोणताही कर लागणार नाही.
एकीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या खात्यात किती रक्कम जमा होते त्यावर सरकार आणि इन्कम टॅक्स विभागाचं लक्ष आहे. अतिरिक्त रक्कम जमा करणाऱ्यांना मोठा दंड आणि टॅक्स लावण्यात येत आहे. मात्र राजकीय पक्षांच्या खात्यावरील रकमेबाबत विचारणाही होणार नाही.
राजकीय पक्षांना आयकर कायद्यातून सूट मिळत असल्यानेच त्याबाबत विचारणा होणार नाही.