5 years of demonetisation : 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. यापैकीच एक धाडसी निर्णय म्हणजे नोटबंदी होय. या निर्णयाला आज पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. 8 नोव्हेंबर 2016 रोजी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केला होता. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. या निर्णयाला आज सोमवार पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. नोटबंदीच्या निर्णयामुळे देशातील भ्रष्टाचार, काळापैसा हद्दपार होईल, दहशतवादी कारवायांवर आळा बसेल, असा दावा मोदींनी केला होता. विरोधकांनी या नोटबंदीला टीका केली होती. बाद केलेल्या नोटांपैकी तब्बल 99 टक्के नोटा बँकेत जमा झाल्या. मोदी यांच्या या निर्णयामुळे अनेक महिने चलन तुटवडा निर्माण झाला होता, अशी टीकाही काँग्रेसने केली. रोख चलनासाठी रांगेत उभे राहिलेल्या जवळपास 50 जणांचा मृत्यू झाल्याचीही टीका विरोधकांनी केली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक नोटबंदी केल्यानंतर सर्वसामान्य जनतेला त्रास सहन करावा लागला होता. दिवसभर रांगेत उभं राहावं लागलं होतं. अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम झाला होता. मागणी घसरल्याने, उद्योग -व्यवसायालाही फटका बसला होता. त्या आर्थिक वर्षात जीडीपी 1.5 टक्क्यांनी घसरला होता. विरोधकांनी मोदींच्या या निर्णयावर कडाडून टीका केली होती. आजही, विरोधकांकडून मोदी सरकारच्या या निर्णयावर टीका केली जाते. स्वातंत्र्य भारतात घेण्यात आलेला हा सर्वात खराब निर्णय असल्याचं मत विरोधकांनी व्यक्त केलं होतं. तर भाजपकडून विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यात आलं होतं.


काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये नोटबंदीचा निर्णय घेतला. 8 नोव्हेंबर 2016 मध्ये रात्री अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नवीन 500 आणि दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या. या नोटांसह 10, 20, 50, 100 आणि 200 रुपयांच्याही नव्या नोटा बाजारात आणल्या. सोशल मीडियावर #notebandi हा ट्रेंड होत आहे. सत्ताधारी आणि विरोधक आपापली मतं मांडत आहेत.