Delhi News: व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात राहणाऱ्या परदेशी लोकांना पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांचं पथक नेब सराय (Neb Sarai) येथील राजू पार्कमध्ये गेले होते. त्यावेळी नायझेरियाच्या 200 ते 300 जणांच्या जमावानं पोलिसांवर हल्ला केला. यावेळी परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. पोलीस आणि जमावामध्ये हाणामारी झाली. आफ्रिकन वंशाच्या 200 ते 300 जणांच्या जमावानं पोलिसांवर हल्ला केला होता. या भांडणाचा फायदा घेत आफ्रिकन नागरिक पळून गेला. पण त्याला पुन्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं. 


शनिवारी दिल्ली पोलिसांचं पथ व्हिसा संपल्यानंतर अवैधरित्या राहणाऱ्या आफ्रिकन नागरिकांना पकडण्यासाठी गेलं होतं. पोलिसांनी पाच नायझेरियाच्या नागरिकांना (Nigerian Nationals) ताब्यात घेतलं होतं. दक्षिण दिल्लीमधील नेब सराय येथे दिल्ली पोलीस गेले व्हिसा संपलेल्यांना ताब्यात घेण्यासाठी गेलं होते. त्यावेळी 200 ते 300 जणांच्या जमावाने पोलिसांवर हल्ला केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 






दक्षिण दिल्लीचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) चंदन चौधरी म्हणाले की, आफ्रिकी देशातील जवळपास 150 ते 200 जणांच्या टोळक्यांनी पोलिसांना कारवाई करण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला. व्हिसा संपलेल्या पण भारतात राहणाऱ्यांना ताब्यात घेण्यासाठी दिल्ली पोलिसांचं पथक पोहचलं होतं. पण जमावानं दिल्ली पोलिसांवर हल्ला केला. पोलिसांनी व्हिसा संपलेल्या नायझेरियाच्या नागरिकांना ताब्यात घेतलेय.  


दुपारी पोलिसांना आफ्रिकन नागरिकांनी कारवाई करण्यापासून रोखलं होतं. त्यानंतर अतिरिक्त पोलिसांना घेऊन दिल्ली पोलिसांनी शनिवारी सायंकाळी पुन्हा एकदा कारवाई केली.   शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता दिल्ली पोलिसांचं संयुक्त पथक पुन्हा राजू पार्कमध्ये गेले होतं. येथून त्यांनी 4 नायझेरियन नागरिकांना पकडले. यामध्ये एका महिलेचाही समावेश होता. यानंतर पुन्हा आफ्रिकेच्या जमावाने पोलिसांना घेरले. यावेळी त्यांची संख्या 150-200 च्या दरम्यान होती. या लोकांनी आरोपींना पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांचे पथक सतर्क होते. पथकाने परिस्थिती हाताळून आरोपींना नेब सराई पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्या हद्दपारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. डेविड विलियम (53), इग्वे इमॅनुएल चिमेजी (33), अजीगबे जॉन (24) आणि क्वीन गॉडविन (26) या चौघांना सांयकाळी पोलिसांनी अटक केली आहे. डेविड विलियम्स याला दुपारी अटक केली आहे.