Sidhu Moosewala Murder : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येतील सहाव्या शूटर्सची ओळख पटली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे सीपी एचएस धालीवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे. स्पेशल सेलची टीम मुसेवाला हत्येप्रकरणी कसून तपास करत आहे. मुसेवाला यांची हत्या अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली, असेही दालीवाल यांनी सांगितले.  


धालीवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसेवाला यांच्या हत्येतील आणखी एका शूटरची ओळख पटली आहे. विक्रम ब्रार असे या सहाव्या शूटर्सचे नाव आहे. यापूर्वी ज्या आठ शूटर्सची नावे समोर आली होती त्यापैकी चार जणांची भूमिका स्पष्ट झाली आहे. सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील संशयित सिद्धेश हिरामण कांबळे उर्फ ​​महाकाळ याला पोलिसांनी  पुण्यातून अटक केली आहे. महाकाळ याची चौकशी केल्यानंत संतोष जाधव आणि नवनाथ सूर्यवंशी यांना साडेतीन लाख रूपये दिल्याचे समोर आले आहे. यात महाकाळ याला 50 हजार रुपये मिळाले. शूटर्सची व्यवस्था करण्याचे काम विक्रम ब्रार याने केल्याचे तपासात पुढे आले आहे. 


चोरीच्या वाहनाची रेकी करण्यात आली


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन जणांनी मुसेवाला याच्या हत्येपूर्वी चोरीच्या गाडीतून रेकी केली होती. दरम्यान, लॉरेन्सबाबत दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि महाराष्ट्र पोलिसांच्या सतत संपर्कात आहे.  


दिल्ली पोलिसांनी सांगितले की, सलमान खानला धमकी देणारे पत्र विक्रम ब्रारच्या टोळीने पाठवले होते. ज्याचा मास्टरमाईंड विक्रम ब्रार आहे. या प्रकरणात तिघांचा सहभाग असून तो लॉरेन्स बिश्नोई गँग लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य आहे. तिघेही मुंबईतील कल्याण परिसरात राहत होते. तिन्ही आरोपी राजस्थानचे आहेत. 


महत्वाच्या बातम्या


Sidhu Moose Case : शार्प शूटर महाकाल उलगडणार मुसेवालांच्या हत्येचं रहस्य? पंजाब पोलिसांकडून चौकशी 


Moose Wala Murder : 10 दिवस... 8 जण कैद; कसा रचला सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा कट?