Delhi-NCR School: देशाच्या राजधानीत सतत वाढत असलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या समितीने दिल्ली-एनसीआरमधील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच पुढील आदेश येईपर्यंत ऑनलाइन वर्ग सुरू राहणार आहे.


दरम्यान, प्रदूषणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वायु गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने पुढील आदेश येईपर्यंत सर्व खासगी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.


देशाची राजधानी पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन लावण्याची वेळ येतेय की काय अशी स्थिती निर्माण झालीय. अखेर सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) या सगळ्यावर केंद्र आणि राज्याचे कान उपटल्यानंतर सरकार जागे झाले आहे.


50 टक्के लोकांना वर्क फ्रॉम होमची परवानगी द्यावी


मंगळवारी रात्री हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने वायू प्रदूषणाला तोंड देण्यासाठी अनेक सूचना दिल्या. तसेच, आयोगाने म्हटले आहे, की 50 टक्के सरकारी अधिकाऱ्यांना 21 नोव्हेंबरपर्यंत घरून काम करण्याची परवानगी द्यावी. याशिवाय खासगी कार्यालयांनाही त्याचा अवलंब करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.



21 नोव्हेंबरपर्यंत ट्रकला नो एन्ट्री


हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाकडून 21 नोव्हेंबरपर्यंत दिल्लीत ट्रकच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक वस्तूंच्या प्रवेशावर कोणतेही बंधन असणार नाही. याशिवाय रेल्वे, मेट्रो, विमानतळ आणि राष्ट्रीय सुरक्षा/संरक्षण वगळता सर्व बांधकामांवर 21 नोव्हेंबरपर्यंत बंदी असेल.


एक्यूआय (Air Quality Index) कसं मोजतात?


दरम्यान, 0 आणि 50 मध्ये एक्यूआयला 'उत्तम', 51 आणि 100 मध्ये 'संतोषजनक', 101 आणि 200मध्ये 'मध्यम', 201 आणि 300 मध्ये 'खराब', 301 आणि 400 मध्ये 'अत्यंत खराब' आणि 401 आणि 500 मध्ये 'गंभीर' समजलं जातं.


दरम्यान दिल्लीत प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्याची चर्चा सुरू होती. मात्र सर्व विभागासोबत चर्चा झाल्यानंतरच या पर्यायाचा विचार होईल असं अरविंद केजरीवाला यांनी स्पष्ट केले आहे. दिल्लीत ऑक्टोबर महिन्यापासून हवेची प्रदूषण पातळी वाढायला लागली आहे. आसपासच्या राज्यांमध्ये शेत जाळण्याच्या प्रकारातून हे प्रदूषण होत असल्याचं समोर आलंय. सध्य प्रदूषणामुळे दिल्लीत आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे.


संबंधित बातम्या :