Rohini Court Blast: नवी दिल्लीतील (New Delhi) रोहिणी न्यायालयात (Rohini Court) आज सकाळी स्फोट झाल्यानं परिसरात एकच खळबळ माजलीय. या स्फोटात न्यायालयातील कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी (Delhi Police) न्यायालय रिकामं केलं असून पुढील चौकशीला सुरुवात केलीय. 


रोहिणी न्यायालयाच्या रुमनंबर 102 मध्ये आज सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास स्फोट झालाय. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या स्फोटमध्ये न्यायालयातील दोन कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हा स्फोट कशामुळं झालाय? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. सध्या न्यायालयात सुरू असलेल्या सर्व खटल्याची सुनावणी थांबवण्यात आलीय. दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केलीय. 


एएनआयचं ट्वीट-



यापूर्वी रोहिणी न्यायालयात गोळीबार झाल्याची घटना घडली होती. गोगी म्हणजेच जितेंद्र मान यांना पोलिसांनी सुनावणीसाठी रोहिणी येथील न्यायालयात आणलं होतं. त्याचवेळी काही जणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात गोगी यांचा मृत्यू झाला. प्रत्युत्तरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन्ही हल्लेखोर ठार झाले. या घटनेनंतर परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-