International Anti-Corruption Day 2021: भ्रष्टाचार ही सर्वात जटिल सामाजिक, राजकीय आणि आर्थिक घटनांपैकी एक आहे, ज्याने जगातील सर्व देशांना प्रभावित केले आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध जनजागृती करण्यासाठी दरवर्षी ९ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन (International Anti Corruption Day) साजरा करण्यात येतो.
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनाचा इतिहास
जगातील जवळपास सगळेच देश भ्रष्टाचाराच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. भ्रष्टाचाराविरोधात संयुक्त राष्ट्र संघाने 31 ऑक्टोबर 2003 रोजी एक ठराव मंजूर केला होता. त्यानंतर दरवर्षी 9 डिसेंबर रोजी भ्रष्टाचार विरोधी दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनाचे महत्त्व
आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचारविरोधी दिनाच्या निमित्ताने भ्रष्टाचारविरोधात व्यापकपणे जनजागृती करण्यात येते. भ्रष्टाचारविरोधी दिनाच्या निमित्ताने अनेक संस्था, संघटना भ्रष्टाचाराचे परिणाम आणि तो कसा रोखावा याबाबतची जगजागृती करतात. विशेष कार्यक्रमाचे आयोजन करतात.
भ्रष्टाचारामुळे काय नुकसान?
लोकशाही संस्थांचा पाया वाचवायचा असेल तर भ्रष्टाचाराचीमुळे खोलवर रोखण्याची गरज आहे. भ्रष्टाचार हा देशाच्या आर्थिक विकासालादेखील खीळ घालतो. संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार, दरवर्षी एक ट्रिलीयन डॉलर रक्कम ही लाच म्हणून दिली जाते. तर, 300 लाख कोटी रुपयांचा दरवर्षी अपहार होतो. ही रक्कम जगाच्या जीडीपीच्या पाच टक्के इतकी आहे. भ्रष्टाचारामुळे कायदे, नियमांना बगल दिली जाते. त्याचा परिणाम प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सामान्य नागरिकांवर होत असतो. शिक्षण, आरोग्य यासह अन्य सुविधांवरही भ्रष्टाचाराचा परिणाम होतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- नागालँड गोळीबाराशी AFSPA या कायद्याचा संबंध काय? जाणून घ्या या विशेष कायद्याबाबत
- CDS जनरल बिपीन रावत यांच्यासह देशाने गमावलेले 'हे' योद्धे
- Omicron Variant : दिलासा! राज्यातील पहिला ओमायक्रॉनबाधित रुग्ण कोरोनामुक्त
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha