दिल्ली विधानसभेच्या सर्व 70 जागांचे कल हाती आले आहेत. या कलांनुसार दिल्लीकरांनी तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल यांना साथ दिल्याचं चित्र आहे. आम आदमी पक्ष 57 जागांवर आघाडीवर तर भाजप 13 जागांवर पुढे आहे. काँग्रेसला अद्याप खातंही उघडता आलं नाही. हे कल आहेत, त्यामुळे आकडे बदलू शकतात. परंतु येत्या काही तासात चित्र स्पष्ट होईल.
दिल्लीच्या निवडणुकीसाठी भाजपला महाराष्ट्रातून रसद; राज्यातील दिग्गज नेते प्रचारासाठी राजधानीत
मागील निवडणुकीत 'आप'ला 67 जागांवर यश
मागील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 67 जागांवर विजय मिळवला होता. तर भाजपच्या खात्यात तीन जागा गेल्या होत्या. याचाच अर्थात मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपच्या जागांमध्ये जवळपास तीन पट वाढ झाली आहे. तर आपच्या जागांमध्ये घट झाली आहे.
फडणवीस, तावडे, पाटलांना दिल्लीत जबाबदारी
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून रणनीती आखण्यात आली. त्यानुसार राज्यातील एकूण 25 जणांवर जबाबदारी देण्यात आली होती. देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार यांच्यासह राज्यातील महत्त्वाचे नेते दिल्लीत प्रचारासाठी गेले होते. एवढंच नाही तर नाराजी नाट्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, प्रवीण दरेकर, संजय कुटे, सुरजित सिंह ठाकूर यांचाही निवडणूक प्रचारात समावेश करण्यात आला होता. राज्यातील प्रत्येक नेत्याकडे एकूण 10 विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी वाटून देण्यात आली होती. त्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पत्रक वाटण्यावरुन सोशल मीडियावर खूप चर्चा झाली होती.
परंतु राज्यातील भाजप नेत्यांनी दिल्लीत केलेल्या प्रचाराचा फारसा उपयोग झाला नसल्याचं निकालामुळे स्पष्ट झालं आहे.
संबंधित बातम्या
Delhi Election Results LIVE UPDATES | सुरुवातीच्या कलांनुसार दिल्लीत 'आप'चं सरकार
Delhi Election 2020 | निवडणूक निकालांपूर्वीचं अलका लांबा यांचं 'हे' ट्वीट चर्चेत
Delhi Elections Result 2020 : ‘फिर एक बार केजरीवाल’, पक्ष कार्यालयामध्ये जोरदार सेलिब्रेशन
Delhi Election Results | सर्व 70 जागांचे कल हाती, 'आप'ला स्पष्ट बहुमत