नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे. यंदाची दिल्ली विधानसभा निवडणूक भाजपनं प्रतिष्ठेची केली आहे. केजरीवाल यंदा हॅटट्रिक साधणार की दिल्लीत भाजप चमत्कार करणार हे पाहणं महत्वाचं आहे. परंतु दिल्ली विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच कलांमध्ये आम आदमी पार्टिने मुसंडी मारली असून भाजप पिछाडीवर आहे. तर काँग्रेसला मात्र अद्याप खातंही उघडता आलं नाही.
दिल्लीतील चांदनी चौक विधानसभा मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवार अलका लांबा यांनी निवडणुकीचे निकाल जाहिर होण्यापूर्वीच ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटमध्ये त्यांनी आपल्या मुलासोबतचा संवाद लिहिला आहे. 'आई चिंता करू नकोस, आपण जिंकत नसलो तरी आपण पराभूतही होत नाही आहोत' असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलेल्या संवादादत लिहिलं आहे.
अलका लांबा यांनी आणखी एक ट्वीट केलं आहे. त्या ट्वीटमध्ये त्यांनी, 'हम होंगे कामयाब' असं लिहित #JaiHind हा हॅशटॅगही वापरला आहे.
दिल्लीमध्ये सत्ताधारी आम आदमी पार्टीविरुद्ध भाजपा आणि काँग्रेस असा तिरंगा सामना आहे. त्यामुळे आता दिल्ली विधानसभा निवडणुकीत गड कोण राखणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. आठ फेब्रुवारी रोजी मतदान केंद्राबाहेर अलका लांबा आणि आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये वादावादी झाली होती. त्यावेळी आपच्या एका कथित कार्यकर्त्याने अलका लांबा यांच्याबाबत आक्षेपार्ह शेरेबाजी केली होती. त्यामुळे संतापलेल्या अलका लांबा यांनी या कार्यकर्त्यावर हातही उगारला होता. या प्रकारामुळे पररिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्याला ताब्यात घेतले होते.
पाहा व्हिडीओ : अरविंद केजरीवाल दिल्ली राखणार? विश्लेषकांना काय वाटतं?
दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणूकांमध्ये सत्ताधारी आम आदमी पार्टीविरुद्ध भाजपा आणि काँग्रेस अशी लढत आहे. दिल्ली मतमोजणीला सुरुवात होताच आम आदमी पक्षानं आघाडी घेतली असून भाजप पिछाडीवरच आहे. तसेच अद्याप काँग्रेस सरकारला मात्र खातंही उघडता आलं नाही. त्यामुळे मतमोजणीपूर्वीच अलका लांबा यांनी केलेलं ट्वीट सध्या चर्चेत आहे.
एक्झिट पोलमध्ये 'आप'चा विजय
मतदानानंतर झालेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये अंदाज वर्तवला होता की, अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष हॅटट्रिक साधून सत्ता स्थापन करेल. तर दुसरीकडे स्वबळावर सत्ता स्थापन करुन असा दावा भाजप करत आहे.
मागील निवडणुकीत 'आप'ला 67 जागांवर यश
दिल्लीमध्ये विधानसभेच्या 70 जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा 36 आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 67 जागांवर विजय मिळवला होता.
संबंधित बातम्या :
Delhi Election Results LIVE UPDATES | सुरुवातीच्या कलांनुसार दिल्लीत 'आप'चं सरकार
Delhi Election 2020 : निकाला आधीच भाजपने पराभव स्वीकारला होता? कार्यालयाबाहेरील पोस्टरवरून चर्चा
Delhi Election Results | सर्व 70 जागांचे कल हाती, 'आप'ला स्पष्ट बहुमत