Delhi Election Results LIVE UPDATES | दिल्लीचाच नाही तर संपूर्ण देशाचा विजय : अरविंद केजरीवाल

दिल्ली कुणाची याचा फैसला आज होणार आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी 61.45 टक्के मतदान झालं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Feb 2020 03:43 PM
दिल्लीकरांनी त्यांच्या मुलावर विश्वास ठेवला, त्याबद्दल आभार. हा केवळ दिल्लीचा नाही तर संपूर्ण देशाचा विजय आहे : अरविंद केजरीवाल
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आप पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे आणि दिल्लीतील जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन. दिल्लीतीन जनतेने मन की बात नव्हे तर जन की बात देशात चालणार हे दाखवून दिलं. तथाकथीत राष्ट्रीय विचारांचे सरकार दिल्लीत असून आणि त्यांनी सर्व ताकद पणाला लावूनही त्यांचा झाडूसमोर टिकाव लागला नाही, बलाढ्य पक्षावे आपले रथी महारथी निवडणुकीत उतरवून, अरविंद केजरीवाल यांची थेट दहशतवाद्यांशी तुलना करून, स्थानीक प्रश्नावरून दुर्लक्ष करण्यासाठी विनाकारण आंतरराष्ट्रीय विषय आणून मतदारांचे मन विचलीत करण्याचा प्रयत्न करून सुद्धा अरविंद केजरीवाल यांना ते पराजीत करू शकले नाहीत, दिल्लीतील जनता विकास करणाऱ्या प्रामाणिक माणसाच्या मागे ठामपणे उभी राहिली आणि जनतेने लोकशाही वरचा भरोसा कायम असल्याचे दाखवले. आपण तेवढेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे आणि इतर सर्व देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळाही दिल्लीकर मतदारांनी फोडला, दिल्लीकर जनतेचे आणि अरविंद केजरीवाल यांचे मी महाराष्ट्रातर्फे आणि शिवसेनेतर्फे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी विकासमय वाटचालीस शुभेच्छा देतो.' अशी प्रतिक्रीया शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केली आहे.
दिल्लीकरांनी भाजप, मोदी-शाहांना नाकारलं. संपूर्ण देशात वातावरण बदलत आहे. शिवसेनेने देशाच्या राजकारणाला नवं वळण दिलं, शिवसेना नेते अनिल परब यांची दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया
पटपडगंज मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे स्टार प्रचारक आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया पिछाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात भाजपचे रवीद्र सिंह नेगी मैदानात आहेत.
दिल्ली विधानसभेच्या सर्व 70 जागांचे कल हाती, आप 56 तर भाजपला 14 जागांवर आघाडी, काँग्रेसने खातंही उघडलं नाही
आप 52, भाजप 12 जागांवर आघाडी
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि 'आप'चे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि कुटुंबीय निवासस्थानाहून पक्ष कार्यालयाकडे रवाना
सुरुवातीच्या कलानुसार आम आदमी पक्षाने बहुमताचा आकडा गाठला; आप 40, भाजप 13 जागांवर पुढे, काँग्रेसने अद्याप भोपळाही फोडला नाही
पोस्टल मतदानात भाजपचे कपिल मिश्रा मॉडेल टाऊन मतदारसंघात पिछाडीवर; आप 33, भाजप 12 जागांवर पुढे
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षा भाजपपेक्षा तिप्पट जागांवर आघाडीवर, आप 33, भाजप 10 जागांवर पुढे
सुरुवातीच्या कलांमध्ये अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आघाडीवर
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात, पहिला कल हाती, 'आप'ला 10 आणि भाजपला 5 जागांवर आघाडी
आजचा दिवस भाजपसाठी चांगला असेल. आज आम्ही सत्तेत येणार आहोत. जर आम्ही 55 जागा जिंकल्या तर आश्चर्य वाटून घेऊ नका : दिल्लीचे भाजप अध्यक्ष मनोज तिवारी

पार्श्वभूमी

Delhi Election Results LIVE UPDATES : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज (11 फेब्रुवारी) जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. दिल्ली विधानसभेसाठी यंदा एकूण 672 उमेदवार मैदानात आहे, ज्यात 593 पुरुष आणि 79 महिला उमेदवार आहेत. या निवडणुकीत एकूण 62.59 टक्के मतदान झालं आहे. 2015 च्या विधानसभा निवडणुकीच्या ही टक्केवारी पाच टक्क्यांनी कमी आहे. 2015 मध्ये दिल्लीत 67.49 टक्के मतदान झालं होतं. प्रमुख लढत सत्ताधारी आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे.अरविंज केजरीवाल हॅटट्रिक साधून दिल्लीचं तख्त राखणार की भाजप किंवा काँग्रेस सत्ताबदल करणार हे आज स्पष्ट होईल.


एक्झिट पोलमध्ये 'आप'चा विजय
मतदानानंतर झालेल्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये अंदाज वर्तवला होता की, अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष हॅटट्रिक साधून सत्ता स्थापन करेल. तर दुसरीकडे स्वबळावर सत्ता स्थापन करुन असा दावा भाजप करत आहे.


मागील निवडणुकीत 'आप'ला 67 जागांवर यश
दिल्लीमध्ये विधानसभेच्या 70 जागा आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा 36 आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने 67 जागांवर विजय मिळवला होता.

संबंधित बातम्या

Delhi Exit Poll | दिल्लीत 'फिर एक बार, केजरीवाल सरकार', आप हॅटट्रिक साधणार, एक्झिट पोलचा अंदाज

Poll of Exit Polls | दिल्लीत 'आप'चा बोलबाला, केजरीवालच पुन्हा सत्तेत, सर्व पोल्सचा अंदाज








 




 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.