Delhi Diwali Puja 2021:  दिल्लीतील (Delhi) त्यागराज स्टेडियमवर (Thyagraj Stadium) दिवाळी पूजेच्या आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी उपस्थिती लावली. याचबरोबर दिल्लीतील अनेक मंत्री आणि आम आदमी पक्षाचे अनेक नेतेही या पूजेच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यागराज स्टेडिअमवर अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराचा तात्पुरता आराखडा तयार करण्यात आला होता. 


हे देखील वाचा- COP 26 : मोदींनी घोषणा केलेलं नेट झिरो 2070 म्हणजे काय? भारताला हे लक्ष्य गाठणं शक्य होईल का? जाणून घ्या सोप्या शब्दात


दिवाळी पूजेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल उपस्थित होत्या. या व्यतिरिक्त दिल्ली सरकारचे मंत्री गोपाल राय, उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या कार्यक्रमानिमित्त त्यागराज स्टेडियमला ​​आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.  मुख्यमंत्र्यांच्या आगमनानंतर येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. महत्वाचे म्हणजे, कोरोना निर्बंधाचे पालन करून हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. 


हे देखील वाचा- PM Modi On Diwali : पंतप्रधान मोदी जम्मू-काश्मीरच्या जवानांसोबत साजरी करणार दिवाळी


दिल्लीसह संपूर्ण देश गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोना महामारीचा सामना करीत आहे. या काळात अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावं आणि नागरिकांच्या आनंदात भर पडावी, अशी  प्रार्थना या कार्यक्रमात करण्यात आली.


हे देखीवल वाचा- Petrol-Diesel : केंद्राच्या कपातीनंतर काही राज्यांकडूनही व्हॅट कपातीचा निर्णय, महाराष्ट्र सरकार कधी करणार?


या कार्यक्रमापूर्वी सीएमओ दिल्ली ट्विटर हँडलवरून असं सांगण्यात आलं होतं की, दिल्लीचा दिवाळी कार्यक्रम यावेळी खास पद्धतीने साजरा करण्यात येईल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सर्व मंत्र्यांच्या उपस्थित पूजा केली करण्यात येईल. या भव्य पूजेचा कार्यक्रम सर्व प्रमुख टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल.