Brij Bhushan Sharan Singh : महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या लैंगिक छळाच्या प्रकरणाची पुढील चौकशी करण्याची मागणी आणि याचिका फेटाळलेल्या प्रशिक्षकाच्या कॉल डिटेल्स सादर करण्याची मागणी करणाऱ्या भाजप खासदार आणि WFI चे माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांची यांची याचिका दिल्ली राऊस अव्हेन्यू कोर्टाने फेटाळली आहे. बृजभूषण सिंह यांनी घटनेच्या दिवशी आपण भारतात नसल्याचा दावा केला होता.
7 मे रोजी निर्णय होणार
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, दंडाधिकारी प्रियंका राजपूत यांनी या प्रकरणी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोप निश्चित करण्यासाठी 7 मे ही तारीख निश्चित केली आहे.
त्यावेळी भारतात नव्हतो, बृजभूषण यांचा दावा
बृजभूषण सिंह यांनी न्यायालयात याचिका दाखल करून आरोपांवरील युक्तिवाद आणि पुढील तपासासाठी वेळ मागितला होता. WFI कार्यालयात आपला छळ झाल्याचा आरोप एका तक्रारदाराने केला आहे. बृजभूषण सिंह म्हणाले होते की, त्या दिवशी मी भारतात नव्हते. बृजभूषण सिंह यांच्या वकिलाने दावा केला की दिल्ली पोलिसांनी तक्रारदारासोबत असलेल्या कोचच्या कॉल डिटेल रेकॉर्डवर (सीडीआर) विश्वास ठेवला होता आणि सांगितले की ते 7 सप्टेंबर 2022 रोजी WFI कार्यालयात गेले होते, जिथे विनयभंग करण्यात आला होता.
पोलिसांनी गेल्यावर्षी आरोपपत्र दाखल केले होते
मात्र, पोलिसांनी सीडीआर रेकॉर्डवर ठेवलेला नाही, असा दावा वकिलाने केला. दिल्ली पोलिसांनी 15 जून 2023 रोजी सहा वेळा खासदार राहिलेले बृज0भूषण शरण सिंह विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणी पोलिसांनी WFI चे निलंबित सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनाही आरोपी केले होते.
इतर महत्वाच्या बातम्या