Delhi Coronavirus Case Update : राजधानी नवी दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्लीमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या दोन हजारांच्या पुढे आढळत आहेत. त्यामुळे दिल्लीकरांच्या पुन्हा एकदा चिंतेत वाढ झाली आहे.  रविवार दिल्लीच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील  24 तासांत राजधानी दिल्लीमध्ये 2423 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दोन रुग्णांचा मृत्यू झालाय. दिल्लीचा पॉझिटिव्हिटी रेट 14.97 टक्केंवर पोहचलाय. सध्या राजधानी दिल्लीमध्ये 8 हजार 045 सक्रीय रुग्ण आहेत. 


दिल्ली सरकारच्या आरोग्य  विभागाने रविवारी जारी केलेल्या हेल्थ बुलेटिनच्या माहितीनुसार, मागील 24 तासांत 16186 चाचण्या झाल्या. यामध्ये  2423 कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत.  त्याशिवाय दोन रुग्णांचा मृत्यू झाला तर  1725 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आश्चर्यकारक बाब म्हणजे, सध्याचा दिल्लीचा पॉझिटिव्हिटी रेट  15 टक्केंच्या जवळ पोहचलाय. सध्या दिल्लीमध्ये एकूण 5173 कोरोना रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत तर  449 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.  


दिल्लीच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये  157 रुग्ण आयसीयूमध्ये  आहेत तर 124 रुग्ण ऑक्सीजन सपोर्टवर आहेत. तर 16 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.  दिल्लीमध्ये उपचार घेत असलेले रुग्ण  378 रुग्ण दिल्लीचे आहेत तर   71 रुग्ण दिल्लीबाहेरील आहेत. 


देशात 18 हजार 738 नवीन कोरोनाबाधित, 40 रुग्णांचा मृत्यू (Covid 19 in India)


देशात कोरोना संसर्गातील वाढ कायम आहे. देशात कोरोनाबाधितांसह मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत 18 हजार 738 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात शुक्रवारी दिवसभरात 19 हजार 406 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर दिवसभरात 49 रुग्णांचा मृत्यू झाला. याच्या तुलनेत शनिवारी दिवसभरात आढळलेल्या रुग्णांची संख्या किंचित कमी झाली असली, तरी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचं प्रमाण वाढलं आहे. ध्या भारतात 1 लाख 34 हजार 933 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. देशात 18 हजार 558 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. भारतात आतापर्यंत एकूण 4 कोटी 34 लाख 84 हजार 110 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सक्रिय रुग्णांचे प्रमाण 0.31 टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.50 टक्के आहे. गेल्या 24 तासांत 19 हजार 928 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 5.02 टक्के आहे.