Maharashtra Live blog: दिल्लीमधील हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Maharashtra Live blog updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

Advertisement

रोहित धामणस्कर Last Updated: 11 Nov 2025 02:03 PM

पार्श्वभूमी

Delhi bomb blast Live updates: नवी दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी (10 नोव्हेंबर) झालेल्या स्फोटात (Delhi Red Fort Blast) आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे तर 30 हून अधिक...More

उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील कंडक्टर अशोक कुमार गुर्जर यांचा मृत्यू; मूळगावी शोककळा

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार स्फोटात उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील रहिवासी अशोक कुमार गुर्जर यांचा मृत्यू झाला आहे. अशोक कुमार हे दिल्ली परिवहन महामंडळात (DTC) कंडक्टर म्हणून कार्यरत होते आणि त्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर आणि मंगरौला या त्यांच्या मूळ गावी शोककळा पसरली आहे. एका नातेवाईकाने सांगितले, 'ते (अशोक कुमार) डीटीसीमध्ये नोकरी करत होते, प्रायव्हेट. ते दिवाळीला आले होते आणि त्यानंतर गेले होते.' या घटनेनंतर संपूर्ण गावात आणि कुटुंबात दुःखाचे वातावरण असून, कुटुंबातील काही सदस्य दिल्लीकडे रवाना झाले आहेत. या स्फोटात आतापर्यंत अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली असून, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.